Ameya khopkar on Pathaan film: शाहरुख खानचा पठाण काल २५ जानेवारीला संपूर्ण जगभरात रिलीज झाला. पहिल्याच दिवशी पठाण ने सगळ्यांचे रेकॉर्ड मोडीत काढले. पठाण ने जगभरातुन १०० कोटींची कमाई केली आहे. पण हेच यश मराठी चित्रपटांसाठी अडचणीचे ठरत आहे.
'पठाण'ला जगभरातुन तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पठाण पहिल्याच दिवशी १०० कोटी क्लब मध्ये दाखल झालाय. शाहरुख ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर आला आणि त्याने रेकॉर्ड केला. पण हा रेकॉर्ड मराठी चित्रपटांसाठी घातक ठरत आहे. कारण 'पठाण' मुळे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीय.
(Ameya khopkar angry tweet on jitendra awhad for marathi movie not get theater because of Pathaan movie)
हेही वाचा- ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा
अखेर याबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आवाज उठवला आहे. केवळ आवाज उठवला नाही तर त्यांनी थेट राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर घणाघाती हल्ला केला आहे.
कारण 'हर हर महादेव' चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप करून थेट चित्रपट गृहात जाऊन चित्रपट बंद पाडला होता. पण आज 'पठाण' मुळे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसताना जितेंद्र आव्हाड कुठे आहेत असा थेट सवाल आव्हाड यांनी केला आहे.
याबाबत अमेय खोपकर यांनी अत्यंत सडेतोड भूमिका मांडली आहे. ''‘हर हर महादेव’ वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावणारे आव्हाड आता कुठे गेले? ‘पठाण’ मुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नसताना आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत?'' असे ट्विट त्यांनी केले आहे.
आता यावर आव्हाड काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण 'पठाण'मुळे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याने मनसे अधिक आक्रमक होणार असे दिसते आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.