Amitabh Bachchan Tweet
Amitabh Bachchan Tweet Esakal
मनोरंजन

Amitabh Bachchan Tweet: 'खेल खतम, पैसा हजम?!', अमिताभ इलॉन मस्कवर पुन्हा भडकले.. अलाहाबादी शैलीतच झापलं

Vaishali Patil

गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडिया प्लटफॉर्म असलेले ट्विटर यात अनेक बदल होत आहे. ट्विटर या मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइटवरून अनेक सेलिब्रिटींच्या अधिकृत खात्यांवरून ब्लू टिक काढून टाकण्यात आली आहे, त्यानंतर इलॉन मस्कच्या या अचानक निर्णयामुळे सर्वत्रच गोंधळ उडाला.

यामध्ये बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांचाही समावेश होता. जेव्हा त्याच्या नावासमोरील ब्यू टिक गेली. ट्विटरवरून ब्लू टिक गायब होताच अमिताभ बच्चन यांनी एकापाठोपाठ अनेक ट्विट केले. मजेदार 'अलाहाबादी' शैलीत त्यांनी ब्लू टिक परत मागितली होती.

पैसे भरल्यानंतर त्यांना त्यांची ती ब्लू टिक त्यांनी परतही मिळाली. आता त्याला ब्लू टिक मिळाल्यानंतर ही आता त्यानी पुन्हा मध्यरात्री जे ट्विट केले आहे ते वेगळेच आहे. ज्या ब्लू टिकसाठी त्यांनी पैसे दिले होते आता ती मोफत दिली जाणार असल्यानं त्यांनी पुन्हा ट्विट केल.

सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अमिताभ बच्चन यांनी हे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे, 'अरे मारे गये गुलफाम , बिरज में मारे गये गुलफाम...ऐ टिव्टर मावशी, काकू बहीण ताई आत्या ..इतकी सारी तर नावं आहेत तुला..त्या निळ्या टिकसाठी आमच्याकडून पैसे भरुन घेतले..आता म्हणतेस ज्यांचे 1मिलिअन फॉलोवर्स आहेत त्यांना ते फ्रि...मला तर 48.4 मिलिअन आहे आता बोल?? खेल खतम, पैसा हजम ?!'

आता हे ट्विट करण्यामागचं कारण असं की आता ज्यांचे 1 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत त्यांना ही टिक मोफत मिळत आहेत. अशा परिस्थितीत बिग बींनी आपली समस्या या ट्विटच्या माध्यामातुन व्यक्त केली आहे.

आता बिग बीं यांचे हे ट्विट सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यावर त्याच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

एकानं तर त्याच्यांचं शैलीत कमेंट करत लिहिलं आहे की, 'पैसवा अब वापस न होई मुस्कवा ठग लिया नील कमलवा दिखाई के तुम को,अरे राम दुहाई, कैसे चक्कर में पड़ गया हाय हाय हाय'

तर दुसऱ्याने लिहिलयं की, 'मीठी छूरी नहीं मिया. नीली छूरी से हुआ हलाल, छोरा 48 मिलियन वाला' असे अनेक मजेशीर रिप्लाय त्याच्या या ट्विटला आले आहेत. सोशल मिडियावर त्याच्या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Dabholkar Murder Case Timeline: नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा 10 वर्षांनंतर लागणार निकाल? आतापर्यंत काय घडामोडी घडल्या?

PBKS vs RCB Live Score : आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघ लावणार जोर

Latest Marathi News Live Update : जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महाविकास आघाडीला पाठींबा

Saudi Arabia: थेट खून करण्याचाही आदेश...न्यूयॉर्कपेक्षा ३३ पट मोठं शहर उभारत आहे सौदी

IPL 2024: 'रोहित पुढच्या वर्षी मुंबई इंडियन्स सोडेल...', वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी; कोणत्या संघाकडून खेळावं हेही सांगितलं

SCROLL FOR NEXT