Amitabh Bachchan Photo with Rekha viral Says 'There Is a Huge Story...'  SAKAL
मनोरंजन

Amitabh Bachchan - Rekha: अमिताभ यांनी शेअर केला रेखासोबतचा 'तो' फोटो, काय आहे त्यामागची कहाणी?

अमिताभ - रेखा यांचा जुना फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आलंय

Devendra Jadhav

Amitabh Bachchan - Rekha News: अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधले महानायक. गेली अनेक वर्ष अमिताभ विविध सिनेमांमधून लोकांचं मनोरंजन करत आहेत. अमिताभ त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना ब्लॉगद्वारे पोस्ट करत असतात.

अशातच अमिताभ यांनी ब्लॉगवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोत त्यांच्यासोबत रेखा दिसून येतोय. हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल झालाय. काय आहे या फोटोमागची कहाणी?

अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर रेखा, राज कपूर, विनोद खन्ना, संगीत दिग्दर्शक कल्याण, रणधीर कपूर, मेहमूद आणि शम्मी कपूर यांचा एक विंटेज फोटो शेअर केला आहे.

हा फोटो १९७० मधील एका कार्यक्रमातून घेण्यात आला आहे.फोटोमध्ये एका उंच माईकवरुन अमिताभ बच्चन प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसत आहेत. तर विनोद खन्ना, कल्याण आणि राज कपूर त्यांच्यासोबत आहेत. स्टेजच्या दूरच्या कोपर्‍यात शम्मी कपूर आणि रेखा उभ्या असलेल्या दिसत आहेत. सगळेजण जल्लोषाच्या मूडमध्ये असल्याचं दिसतंय.

रविवारी रात्री त्यांच्या ब्लॉगवर फोटो शेअर करताना अमिताभ यांनी लिहिले, “आहाहा.. या फोटोमागे एक मोठी कहाणी आहे.. कधीतरी ती मी सांगेन” अमिताभ अनेकदा इंडस्ट्रीतील त्यांच्या जुन्या दिवसांच्या क्षणांची उजळणी करतात.

अलीकडेच अमिताभ यांनी त्यांचे वडील-कवी हरिवंशराय बच्चन आणि त्यांच्यासोबतच्या दिवसांबद्दल देखील मोकळेपणाने सांगितले. अमिताभ सध्या लेक अभिषेकसोबत अयोध्या राम मंदिर सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन, दिल्लीतील निवासस्थानी घेतला अखेचा श्वास

माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री, धनंजय मुंडे दिल्लीत; राजीनाम्याचं काय झालं?

Pune News : समाज माध्यमांवरील रिल्स, माहिती शरीरासाठी ठरू शकते धोकादायक

Suryachiwadi Wetland:'हिमालयीन एअरलाइन’ने गजबजली सूर्याचीवाडी; जगातील सर्वाधिक उंचीवरचा प्रवासी दाखल, १६ पट्टेरी हंसांचे आगमन..

Karnataka Hapus Mango : कर्नाटकातून हापूस आंबा दाखल

SCROLL FOR NEXT