Amitabh Bachchan Tweet Prime Minister Photo Kailash Parbat PM Modi invites him to explore Gujarat's Rann Utsav, Statue of Unity Esakal
मनोरंजन

PM Modi On Amitabh Bhachchan: कुछ दिन तो गुजारो.. बिग बींना पंतप्रधानांच खास आमंत्रण !

बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी पंतप्रधान मोदींना ट्विट करून कैलास पर्वताबाबत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या तर मोदींनीही त्यांना खास आमंत्रण दिलं आहे.

Vaishali Patil

PM Modi Replied Amitabh Bachchan on Twitter:  पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर रोजी उत्तराखंड दौऱ्यावर होते. पिथौरागढच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी पार्वती कुंड आणि जागेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली.

त्याच बरोबर त्यांनी तेथील आदि कैलास आणि पार्वती कुंडाला भेट दिल्यानंतर ध्यानधारणा केली. ज्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेयर केले होते. त्यानंतर काही तासातच हे फोटो व्हायरल झाले.

त्यानंतर मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी 15 ऑक्टोबर रोजी पार्वती कुंड आणि जागेश्वर मंदिरात पंतप्रधान मोदींच्या दर्शन पुजेचा फोटो X वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केला होता.

अमिताभ यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, "धार्मिकता...रहस्य.' कैलास पर्वताच्या देवत्वाने नेहमीच आकर्षित केले आहे, परंतु समस्या अशी आहे की मी या ठिकाणांना कधीही भेट देऊ शकणार नाही."

तर रविवारी पंतप्रधान मोदींनी अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटला उत्तर दिले. यासोबतच पंतप्रधान मोदींनी अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर कच्छला भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे.

अमिताभ बच्चन यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी लिहिले की, "पार्वती कुंड आणि जागेश्वर मंदिरांचे दर्शन थक्क करणारे होते.काही आठवड्यात रण उत्सव सुरू होत आहे. तुम्ही कच्छला यावे अशी माझी इच्छा आहे. तुमची स्टॅच्यू ऑफ युनिटीची भेट अजून बाकी आहे." आता पंतप्रधान मोदींनी केलेल्या या ट्विटच्या चर्चेला उधाण आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याबद्दल बोलायचं झालं तर १२ ऑक्टोबरला त्यांनी कैलास व्ह्यू पॉइंटवरून आदि कैलासाचे दर्शन घेतले होते. यानंतर भारत-चीन सीमेला लागून असलेल्या गुंजी गाव आणि अल्मोडा येथील जागेश्वर धाम येथे त्यांनी दर्शन घेतले.

या ठिकाणापासून अगदी २० किलोमीटर अंतरावर चीनची सीमा सुरू होते. या दौऱ्यासोबतच नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान बनले आहेत ज्यांनी उत्तराखंडमधील भारत-चीन सीमेवरील आदि कैलासला भेट दिली आहे. आता मोदींनी अमिताभ बच्चन यांना देलेले कच्छ भेटीचे निमंत्रण आता ते स्वीकारतात का हे पाहवं लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : सांगलीतून बाळाला उचललं अन् चिपळूणमध्ये एक लाख ८० हजारांना सौदा, पण माय लेकाच दोरी घट्ट होती...

Nagpur Farmer: ५६ हजारांवर शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षाच; अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, दिवाळीनंतरही मदतीपासून वंचित

Latest Marathi News Live Update : बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, सोयाबीन भिजले

कबाली हत्तीनं अडवला रस्ता, १८ तास वाहतूक ठप्प; वाहनांच्या रांगा, VIDEO VIRAL

AUS vs IND: जरा इकडे ये ऐक... विराट कोहलीने कॅप्टन शुभमन गिलला हात धरून मागे खेचलं अन् मग...; Video Viral

SCROLL FOR NEXT