Anand Mahindra on Vicky Kaushal-starrer 'Sam Bahadur' 
मनोरंजन

Sam Bahadur: 'सॅम बहादूर' पाहिल्यानंतर आनंद महिंद्रांनी दिला रिव्ह्यू! विकीसाठी लिहिली लांबलचक पोस्ट

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी विकी कौशलच्या सॅम बहादूर या चित्रपटासाठी ट्विट केले आहे.

Vaishali Patil

Anand Mahindra on Vicky Kaushal-starrer 'Sam Bahadur': 'सॅम बहादूर' हा सिनेमा 1 डिसेंबर रोजी शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. विकी कौशलच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना आतुरतेने प्रतिक्षा होती. बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक असलेल्या विकी कौशलच्या सॅम बहादूर या सिनेमाची स्पर्धा होती रणबीर कपुरच्या 'अ‍ॅनिमल'सोबत.

आता हा सिनेमा रिलिज होऊन एक दिवस झाला आहे. विकी कौशलचा दमदार अभिनय आणि मेघना गुलजार यांचे दिग्दर्शन समिक्षकांना आवडले आहे. या चित्रपटाची कथा सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे.

चित्रपट रिलिज झाल्यानंतर चाहत्यांची या चित्रपटाला चांगली पसंती मिळाली आहे. सोशल मिडियावर अनेक पोस्टही व्हायरल होत आहेत ज्यात नेटकऱ्यांनी विकीच्या अभिनयाचे कौतूक केले आहे.

आता उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा चित्रपट पाहिला. त्यांना हा चित्रपट कसा आवडला. चित्रपटातील विकी कौशलचे काम आवडले की नाही याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चित्रपटाच्या बारीकसारीक गोष्टींबाबत लिहिले आहे.

'सॅम बहादूर' पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या X पोस्टमध्ये लिहिले, 'जेव्हा एखादा देश जेव्हा आपल्या नायकांच्या कथा सांगणारे चित्रपट बनवतो, तेव्हा एक शक्तिशाली पुण्यचक्र तयार होत असते. विशेषतः सैनिकांबद्दल आणि नेतृत्व आणि धैर्याच्या कथा. अशा कथा लोकांचा अभिमान आणि आत्मविश्वास अनेक पटींनी वाढतात. जेव्हा लोकांना कळते की त्यांच्या धैर्याचे कौतुक केले जाईल, तेव्हा आणखी नायक उदयास येतील.'

आनंद महिंद्रा पुढे आपल्या पोस्टमध्ये लिहितात, 'हॉलीवूड शतकापासून हे करत आहे. त्यामुळे आमच्यासाठी असे चित्रपट बनवल्याबद्दल रॉनी स्क्रूवाला धन्यवाद. विशेषत: या 'गजब का बंदा, सबका बंदा' या गाण्यात म्हटल्याप्रमाणे. चित्रपटात त्रुटी आहेत. पण विकी कौशलने सॅम बहादूरच्या व्यक्तिरेखेत केलेले रूपांतर शहारे आणणारे आहे. हे पुरस्कार विजेत्या उदाहरणापेक्षा कमी नाही. हा सिनेमा पहा आणि एका अस्सल भारतीय नायकाचा जयजयकार करा.'

'सॅम बहादूर' ही फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची कहाणी आहे. त्यांच्या जन्मापासून ते निवृत्तीपर्यंतची कथा नाट्यमय स्वरूपात चित्रपटात दाखवण्यात आली आहेत. या चित्रपटात विकी कौशलने सॅम माणेकशॉची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात विकी कौशल व्यतिरिक्त सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahapalika Election: सर्वात मोठी बातमी! 'या' प्रभागातील निवडणूकीला न्यायालयाची अंतरिम स्थगिती, मतदान कधी होणार?

Latest Marathi News Live Update : पुण्यातील प्रभाग ९ चे राजकारण तापणार

Madhav Gadgil: ‘नीरी’ला कटू सत्याची करून दिली आठवण; पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांनी पर्यावरण अहवालातील त्रुटी केल्या होत्या उघड!

Lonar Lake Level: कमळजा मातेच्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्श; लोणार सरोवरातील जलपातळी आणखी धोक्याच्या टप्प्यावर!

IPO Market : सरकारी मिनीरत्न कंपनीत गुंतवणुकीची संधी! आजपासून IPO खुला; आधी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT