Manjot Singh Saved Girl Video- 
मनोरंजन

अ‍ॅनिमल फेम अभिनेत्याने वाचवला मुलीचा जीव! घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

अ‍ॅनिमल चित्रपटात रणबीर कपूरच्या चुलत भावाची भूमिका साकारणारा अभिनेता मनजोत सिंग अचानक चर्चेत आला आहे.

Vaishali Patil

Manjot Singh Saved Girl Video: गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वात संदीप रेड्डी वंगाच्या अॅनिमल सिनेमानं चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमामुळे रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, तृप्ती डिमरी आणि बॉबी देओल यांची चांगलीच चर्चा झाली. मात्र आता या सिनेमात काम करणाऱ्या मनजोत सिंगची चर्चा रंगली आहे.

मनजोत सिंगने या चित्रपटात रणबीर कपूरच्या चुलत भावाची भूमिका साकारली होती. आता मनजोत सिंग अचानक लाईमलाईटमध्ये आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी मनजोतला रियल लाईफ हिरो म्हणत आहेत. मनजोत सिंगचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी त्याचे खूप कौतुक करत आहेत.

मनजोत सिंगने नोएडा येथील शारदा विद्यापीठातून बीटेक करून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. यावेळी त्याने आत्महत्या करण्यास निघालेल्या एका 18 वर्षीय मुलीचा जीव वाचवला.

खर तर हा व्हिडिओ जुना असल्याचे बोलले जात आहे. मनजोत सिंगचा हा व्हिडीओ 5 वर्ष जुना असल्याचं सांगण्यात येत आहे.

या व्हिडीओत एक मुलगी इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे, मात्र तिने उडी मारताच एक व्यक्ती येऊन तिचा हात धरून तिला वर खेचताना दिसत आहे.

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून असा दावा केला जात आहे की ज्या व्यक्तीने त्या मुलीचा जीव वाचवला तो व्यक्ती 'अॅनिमल' फेम मनजोत सिंग आहे.

हा व्हिडीओ 2019 चा असला तरी 'अॅनिमल' रिलीज झाल्यानंतर हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी त्याला रिअल लाइफ हिरो म्हणत त्याचे कौतूक करत आहेत. मात्र या व्हिडिओत मनजोतचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT