Ankita Lokhande and Vicky Jain gives a glimpse of their griha-pravesh Instagram
मनोरंजन

अंकिता लोखंडेनं दिली गूड न्यूज; पतीसोबत मिळून शेअर केला नवा आनंद...

नुकताच अंकिता आणि विक्कीनं स्मार्ट जोडी या छोट्या पडद्यावरील ऱिअॅलिटी शो चे विजेतेपद पटकावले आहे.

प्रणाली मोरे

अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) आणि विक्की जैन(Vicky Jain) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांनी काही वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर लग्न केलं आहे. त्या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. अंकिता आणि विक्कीच्या जोडीला चाहत्यांनी खूप पसंत देखील केलं. सोशल मीडियावर अंकिता खूप सक्रिय असते आणि विक्की सोबतचे रोमॅंटिक फोटो ती शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच अंकितानं हाताला मेहेंदी लावलेला फोटो इन्स्टाग्राम स्टोरीत शेअर केला होता. आणि लिहिलं होतं,''नव्या सुरुवातीसाठी मी खूप उत्सुक आहे''. अंकिताचा फोटो पाहून चाहते खूपच उत्सुक आहेत. नेमकं काय नवीन करतायत अंकिता आणि विक्की आपल्या आयुष्यात?(Ankita Lokhande and Vicky Jain gives a glimpse of their griha-pravesh)

आता अंकितानं स्वतः याचा खुलासा केला आहे. अंकितानं विक्कीसोबत फोटो शेअर केला आहे. दोघंही ट्रेडिशनल पेहरावात दिसत आहेत. अंकितानं गुलाबी रंगाची नक्षीदार पैठणी नेसली आहे. तर विक्कीनं फिक्कट निळ्या रंगाचा कुर्ता पजामा घातला आहे. फोटो शेअर करीत अंकितानं लिहिलं आहे की,''नव्या सुरुवातीसाठी खूप शुभेच्छा विक्की''. अंकितानं हॅशटॅंग मध्ये 'नवीन घर' असं लिहिलं आहे.

अंकिताच्या या पोस्टवर चाहते खूप खूश होऊन तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत. नवं घर घेतल्यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे. अंकिता आणि विक्की 'स्मार्ट जोडी' या शो मध्ये सामिल झाले होते. त्या शो मध्ये अनेक छोट्या पडद्यावरचे प्रसिद्ध कपल्स देखील सहभागी झाले होते. अंकिता आणि विक्कीनं या शो मध्ये शेवटपर्यंत उत्तम खेळ खेळून अखेर विजेतेपदाची ट्रॉफी पटकावली आहे. ट्रॉफी सोबतच या दोघांना २५ लाख रुपये रोख रक्कम असं बक्षिस मिळालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT