ankita lokhande father passed away at the age of 68  SAKAL
मनोरंजन

Ankita Lokhande: अंकीता लोखंडेच्या वडीलांचं निधन, वयाच्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अंकीता लोखंडेच्या वडीलांचं निधन कशामुळे झालं याचं कारण अद्याप कळू शकलं नाही

Devendra Jadhav

Ankita Lokhande Passed Away News: अभिनेत्री अंकिता लोखंडेचे वडील शशिकांत लोखंडे यांचे निधन झाले आहे. 12 ऑगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ते 68 वर्षांचे होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 13 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले जातील.

काही काळ त्यांची तब्येत खराब होती. अंकिता आणि तिचा पती विकी जैन यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यंदाच्या फादर्स डेला अंकिता लोखंडेने तिचे वडील शशिकांत लोखंडे यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली.

(ankita lokhande father passed away at the age of 68 )

अंकिता लोखंडेने फादर्स डेला लिहिले होते की, "माझ्या पहिल्या हिरो माझ्या वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा. मला तुझ्याबद्दल कसे वाटते हे मी व्यक्त करू शकत नाही, परंतु मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी लहान असताना मी तुला अनेक गोष्टींसाठी झगडताना पाहिलं पण तू सगळं व्यवस्थित ठेवलंस. तू मला नेहमी उडण्यासाठी पंख दिलेस आणि मला जे व्हायचे आहे ते बनण्यास सांगितले.

मी तुझी साथ आणि आधार आहे. मला आठवते की मी जेव्हा मुंबईत करियरचा प्रवास सुरू केला तेव्हा कधी कधी माझ्याकडे भाडे भरायला पैसे नसायचे. पण तुमच्या जीवनात खुप काही गोष्टी चालु असल्या तरीही तुम्ही कायम माझ्या स्वप्नांवर तुम्ही विश्वास असल्यामुळे तुम्ही ते पूर्ण केले."

अंकीताने पुढे लिहिलं होतं की, "मी तुमच्यासाठी आहे आणि मी नेहमीच तुमचा ऋणी राहीन. कठीण काळात तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला तो काही औरच होता आणि त्या काळात तुमच्या हसऱ्या चेहऱ्याने आम्हा सर्वांना पुढे जाण्याची प्रेरणा दिली. मला तुमची मुलगी असल्याचा खूप अभिमान आहे. बाबा तुझ्यावर सदैव प्रेम. फादर्स डेच्या शुभेच्छा पा. तुझी राजराजेश्वरी" अशी पोस्ट अंकीताने लिहीली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Play Off Scenario: गुजरात टायटन्सचा सलग पाचवा विजय! सनरायझर्स हैदराबादला नमवून POINT TABLE मध्ये अव्वल, अनपेक्षित कलाटणी

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्री

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

SCROLL FOR NEXT