Ankita Lokhande with Mother In law Google
मनोरंजन

Video: सासूने 'गूडन्यूज दे' म्हटल्यावर अंकिता लोखंडे काय म्हणाली पहा

अभिनेत्री लग्नानंतर पहिल्यांदाच आपल्या सासरी बिलासपूरला गेली होती.

प्रणाली मोरे

अंकिता लोखंडे(Ankita Lokhande)आणि तिचा बॉयफ्रेंड विकी जैन(Vicky Jain) गेल्या वर्षात डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकले. त्या दोघांचं लग्न मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये फार मोजकेच नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत झाले. मेहेंदी,हळद,संगीत अशा लग्नासंदर्भातल्या सर्वच पारंपरिक गोष्टी अगदी साग्रसंगीतपणे अंकिताच्या लग्ना्च्या वेळेस पार पडलेल्या आपण सर्वांनी सोशल मीडियावर पाहिल्या असतील. अर्थात,अंकिता सोशल मीडियावर फार सक्रिय असते. आणि ती नेहमीच आपल्या संदर्भातल्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टी सोशल मीडियावर शेअर करीत असते. लग्नानंतरही तिच्या हनिमूनचे,संक्रांतीच्या सेलिब्रशनचे फोटो,व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. लग्नानंतर तिनं केलेली काही वक्तव्यही ट्रोल करण्यात आली होती. जसं तिनं म्हटलं होतं की विकीसोबत लग्न हे फक्त पेसै उडवणे,पार्टी करण्यासाठी. तिनं ते मजेनं केलं पण त्याची चर्चा मात्र विरोधात रंगली. तिनं लग्नानंतर बोल्ड सीन किंवा कपडे घालण्यावर स्वतःवर बंधन घालून घेण्याचा घेतलेला मोठा निर्णयही चर्चेचा विषय ठरला. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्याची चर्चा होवू लागली आहे.

अंकिता लोखंडे लग्नानंतर पहिल्यांदाच बिलासपूर इथे विकी आणि आपल्या सासूबाईंसोबत गेली आहे. काही दिवासांपूर्वी तिला मुंबई विमानतळावर स्पॉट केलं गेलं होतं. तेव्हा तिनं मीडियाला फोटो देताना ही गोष्ट बोलून दाखवली होती. 'मी माझ्या लग्नानंतर पहिल्यांदाचा सासरी चालले आहे', असं ती म्हणाली होती. आता तिनं पोस्ट केलेल्या व्हिडीओत ती सासरी गेलेली दिसत आहे. तिथं नवीन नवरीची ओटी तिच्या सासूबाई भरताना दिसत आहेत. त्यांनी ओटी भरल्यावर अंकिता जेव्हा सासूबाईंच्या पाया पडायला वाकते तेव्हा तिला आशीर्वाद देताना त्या म्हणतात,''दूधो,नहाओ,फुतो फलो और गूडन्यूज दो''. तेव्हा अंकिताचा 'आ' वासून उभा राहिलेला चेहरा पाहण्यासारखा आहे. तिच्या जाऊबाईदेखील जेव्हा तिला चिडवतात तेव्हा ती म्हणते,''ज्यांना गूडन्यूजची घाई आहे त्यांनी स्वतः द्यावी''. अर्थात हे ती आपल्या जाऊकडे पाहून म्हणताना दिसतेय. तर असो,अंकिताला सासूबाईंनी दिलेला आशीर्वाद फळा येवो अन् ती लवकरच गूडन्यूज देवो,या आमच्याकडूनही तिला शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT