Ankita Lokhande, Vicky Jain
Ankita Lokhande, Vicky Jain Google
मनोरंजन

अंकिता लोखंडेचा एंगेजमेंट लूक पाहून चाहते म्हणाले,'ही तर बार्बी डॉल!'

प्रणाली मोरे

लग्नसोहळ्यात नटणं-मुरडणं,सजणं-सवरणं या गोष्टी जितक्या करू तितक्या कमीच. त्यात ते लग्न बी-टाऊन किंवा टि.व्ही इंडस्ट्रीतलं असेल तर मग काय सोहळ्याचा थाट विचारूच नका. आता तर बॉलीवूडसोबत टी.व्ही इंडस्ट्रीतही लग्नाचा सिझन सुरू झालाय हे काही वेगळं सांगायला नकोय. बॉलीवूडचं सगळ्यात चर्चेत असलेलं कतरिना-विकीचं लग्न नुकतंच पार पडलं. त्यांच्या लग्नसोहळयाचे फोटो,बातम्या पाहण्यातून उसंत मिळत नाही तोवर आता 'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे लवकरच आपला लॉंग टाइम बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच तिचा साखरपुडा,मेहंदी असे लग्नासंबंधीचे सोहळे पार पडले. यासंदर्भातले फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या प्रत्येक सोहळ्यासाठी तिनं खास पेहराव केला असल्याचं यावरनं दिसून येतंय.

अंकितानं तिच्या साखरपुड्यासाठी छान घेरदार स्कर्ट असलेला ड्रेस परिधान केला होता. तिनं यावेळी आपला भावी नवरा विकीसाठी एली गुल्डिंगचं अत्यंत गाजलेलं रोमॅंटिक गाणं 'लव्ह मी लाइक यू डू' यावर परफॉर्मन्सही दिला. यावेळी तिच्या स्कर्टचा बदलणारा रंग कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं. तिनं यावेळी विकीसोबतही डान्स करत सोहळ्याचा आनंद लुटला. सध्या सोशल मीडियावर तिनं साखरपुड्यात दिलेला परफॉर्मन्स चाहत्यांच्या कौतुकास विशेष पात्र ठरीत आहे. तिच्या एंगेजमेंट लूकला चाहत्यांनी 'बार्बी डॉल'ची उपमा दिली आहे. तर तिच्या फॅन्सनी आपल्या फॅन पेजवरही तो व्हिडीओ शेअर करीत 'बार्बी डॉल' अंकिताला भरभरून लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अंकिता लोखंडे आपल्याला पुन्हा 'पवित्र रिश्ता २' मालिके मधनं दिसतेय. अनेक दिवसांनी अंकिता चर्चेत आली ती सुशांत सिग राजपूतच्या आत्महत्येनंतर. अंकिता आणि सुशांत जवळ-जवळ सहा वर्षांच्या रीलेशनशीपनंतर विभक्त झाले होते. अंकिताचा सतत लग्नासाठी सुरू असलेला तगादा,सुशांतवर शंका घेणं आणि सुशांतचं बॉलीवूडमध्ये करिअर करण्यात बिझी असणं अशी बरीच कारणं दोघांच्या विभक्त होण्यामागे होती असं तेव्हा बोललं जात होतं. सुशांतसोबतच्या ब्रेकअपनंतर अंकितानं इंडस्ट्रीपासून दूर राहणं पसंद केलं होतं. पण एका जवळच्या मित्रामुळे ती बिझनेसमन विकी जैनला भेटली,पुढे मैत्री झाली आणि मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं,आता दोघेही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Sharan Singh : आता मी खुला सांड... तिकीट नाकारलेल्या ब्रिजभूषणनं कोणाला दिलं आव्हान?

Bhushan Patil: "शिवरायांचा छावा" फेम अभिनेता भूषण पाटील करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; म्हणाला, "मी खूप उत्सुक आहे पण..."

Nashik News : मुंढेगावजवळ गोदान एक्सप्रेसच्या चाकाखालून धुर! प्रवाशांनी घाबरून मारल्या उड्या

Yogi Adityanath : पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना भारतात थारा नाही : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT