Ankush Gedam
Ankush Gedam Sakal
मनोरंजन

Filmfare Awards: निव्वळ अभिमान! 'झुंड' मधल्या अंकुश गेडामला मिळाला फिल्मफेअर.. नागराज अण्णानं केलं कौतुक.. म्हणाले...

Aishwarya Musale

दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील चाहते फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 ची आतुरतेने वाट पाहत होते. बॉलिवूड इंडस्ट्रीत फिल्मफेयर हा मोठा सोहळा मानला जातो. फिल्मफेअर पुरस्कारांचे यंदाचे आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 27 एप्रिल 2023 करण्यात आले.

या अवॉर्ड नाईटमध्ये मनोरंजन विश्वातील सर्वच कलाकारांचा मेळावा पाहायला मिळाला. 19 मुख्य श्रेणींमध्ये नॉमिनेशनसह तांत्रिक आणि गैर-तांत्रिक श्रेणींमध्ये अनेक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

याच फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात नागराज मंजुळे यांच्या झुंड चित्रपटातील अंकुश गेडामला बेस्ट डेब्यू अभिनेता अवॉर्ड मिळाला आहे. नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्याचे कौतुक केले आहे. तसेच त्यांनी या पोस्टला कॅप्शन देखील दिले आहे, त्यांनी लिहिले, 'अभिनंदन, अंकुश गेडाम, बेस्ट डेब्यू फिल्मफेअर अवॉर्ड 2023'.

‘सैराट’, ‘फँड्री’, ‘नाळ’ यांसारख्या एकापेक्षा एक दमदार चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट होता. हा चित्रपट ४ मार्च २०२२ ला रिलीज झाला होता. या नागपुरातील विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकांच्या आयुष्यावर आधारित झुंड या चित्रपटाची कथा आहे.

‘झुंड’ या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकारांचे चेहरे पहायला मिळाले. ‘सैराट’ या चित्रपटातील रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर देखील या चित्रपटात होते. अजय-अतुल या लोकप्रिय जोडीने या चित्रपटाला संगीत दिले होते. तसेच चित्रपटात छाया कदम आणि किशोर कदम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT