मनोरंजन

Making Video: 'अंतिम'चा 'विघ्नहर्ता' चर्चेत

युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनानंतर मनोरंजन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसून आले. अनेक मोठमोठ्या बॅनरचे चित्रपट यांना कोरोनाचा फटका बसला. कित्येक निर्माते आणि दिग्दर्शकांना त्याचा तोटा सहन करावा लागला. आता परिस्थिती थोड्याफार प्रमाणात स्थिरावताना दिसते आहे. गेल्या दोन महिन्यापासून बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित झाल्या आहेत. येत्या काळातही मोठ्या प्रमाणावर चित्रपट आणि मालिका प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर अंतिम द फायनल ट्रुथ नावाचा सिनेमा घेऊन येत आहे. त्याच्या टीझरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता त्या चित्रपटातील विघ्नहर्त्याच्या गाण्याच्या मेंकिंगचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.

'अंतिम: द फाइनल ट्रुथ'च्या निर्मात्यांनी 'विघ्नहर्ता'चा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित केला असून तो सद्याच्या टॉप-रेटेड ट्रॅकमधील एक आहे. मेकिंग व्हिडीओमध्ये एक आकर्षक आणि शानदार सेट-अप दाखवण्यात आला आहे. तो प्रेक्षकांना कमालीचा भावला आहे. उत्सवचा हा ट्रॅक श्रवणीय आहे. मेकिंगमध्ये गणपती उत्सवाच्या भव्यतेला दाखवण्यात प्रभावीपणे साकारण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारणाऱ्या सलमान खानची एंट्री दाखवण्यात आली आहे. त्या व्हिडिओमध्ये वरुण धवन आणि आयुष दिसत आहेत. त्यांनी देखील या चित्रपटासाठी मोठी मेहनत घेतली आहे. वरुणची उर्जा दाद देण्यासारखी आहे. दुसरीकडे आयुष प्रत्येक डान्स स्टेप मोठ्या उत्साहात करताना दिसत आहे. त्या गाण्याची कोरियोग्राफी प्रभावी आहे.

हे गाणे उल्हासपूर्ण आणि थिरकायला लावणारे आहे आणि त्याला तितकाच जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे ज्याने मोठ्या संख्येने रँकिंग मिळवली आहे. व्हिडीओ पाहताना, ही मेकिंग कलाकारांसाठी आणि संपूर्ण क्रूसाठी देखील तेवढीच मनोरंजक आहे. गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान, आयुष जखमी झाले होते. चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मोठ्या प्रभावीपणे विघ्नहर्ता गाण्याला सादर केले आहे. 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' सलमान खान फिल्म्सद्वारे प्रस्तुत आणि सलमा खान यांच्याद्वारे निर्मित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईने जिंकली नाणेफेक! जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग ११

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT