Anupam Kher esakal
मनोरंजन

Anupam Kher: 'आई तुझ्यासाठी काश्मीरमध्ये पुन्हा घर घेणारच'! अनुपम रडले...

अनुपम खेर यांच्या आई दुलारी यांना तो निर्णय ऐकल्यानंतर रडू कोसळलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Anupam Kher Mother Dulari Video Viral: बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांचे आणि त्यांच्या मातोश्री दुलारी यांच्या अनोख्या नात्याची नेहमीच चर्चा होत असते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही मिनिटांच्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांना रडवले आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चाही सुरु झाली आहे. जेव्हा अनुपम यांनी आईला घर घेण्याचे वचन दिले. तेव्हा मात्र त्यांचे रडणे नेटकऱ्यांना भावूक केले आहे.

ऑनलाईन शो मंजिले और भी है मध्ये अनुपम यांनी आई दुलारी यांना एक प्रश्न विचारला होता. तो असा की, त्यांनी शिमल्यामध्ये घर घेण्याचा आग्रह का केला होता. त्यावर दुलारी यांनी म्हटले की, त्या शहरामध्ये माझ्या मैत्रीणी राहतात. मात्र शिमला तर काश्मीरचा भाग असता तर त्याठिकाणी देखील आपल्याला घर काही मिळाले नसते. आता काश्मीरमध्ये आर्टिकल370 हटवले गेले आहे. त्यामुळे दुलारी यांच्याकडे डोमिसाईल आले आहे. आता त्यांना काश्मिरमध्ये घर घेता येणार आहे.

मुलानं घर घेण्याचं वचन दिल्यानं आईला रडू आलं....

अनुपम खेर यांच्या आई दुलारी यांना तो निर्णय ऐकल्यानंतर रडू कोसळलं आहे. सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन अनुपम यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येते की, दुलारी या अनुमप खेर यांना विचारतात की, नवीन घर घेणे खरचं शक्य आहे का? जर तसे झाले तर मग बंगलाच घ्यावा. असे त्यांनी म्हटले आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे.

दुलारी म्हणतात की, मला करण नगरमध्ये तितलीच्या थोडं पुढे एक घर घ्यायचे आहे. त्यामध्ये आपण दोघेही राहू शकतो. यावेळी अनुपम यांनी घर घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर मात्र दुलारी यांना रडू कोसळते. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना देखील भावूक करुन गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या! पुणे, मुंबईसह आज राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ६ सप्टेंबर २०२५ ते १२ सप्टेंबर २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 6 सप्टेंबर 2025

अग्रलेख : तंत्रज्ञानाचे ‘विक्रम’ संवत!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 6 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT