Anupam Kher on Satish Kaushik Death Esakal
मनोरंजन

Satish Kaushik यांच्या जाण्यानं अनुपम खेर धक्क्यात! पोहचले कालीघाट मंदिरात Video viral

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवुड मधील एक दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी 9 मार्च रोजी निधन झाले. वयाच्या 66 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने बॉलीवूडवर मोठी शोककळा पसरली आहे. अजुनही त्याचे जाणे हे त्याच्या चाहत्यांना मान्य नाही. त्यांनी त्याच्या अभिनयाने आणि स्वभावाने सर्वांचे मन जिंकले होते.

त्यांचा मित्र आणि चाहता परिवारही खुप मोठा होता. सतीश कौशिक यांच्या निधनाने प्रत्येकजण दु:खी झाला आहे , परंतु त्यांच्या कुटुंबानंतर जर कोणी सर्वात जास्त दुखावलं गेलं असेल तर ते आहेत अनुपम खेर. हे दोघेही जुने मित्र होते आणि जेव्हा सतीशच्या निधनाची बातमी आली तेव्हा अनुपम खेर खुपच दुखी झाले.

सोशल मीडियावर मित्राच्या मृत्यूची माहिती देण्यापासून ते मीडियाशी बोलण्यापर्यंत अनुपम खेर खूपच अस्वस्थ होते त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्याचवेळी, सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर तीन दिवसानंतर ते आता प्रार्थना करण्यासाठी कोलकाता येथील कालीघाट मंदिरात पोहोचले.

अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ते मंदिराच्या आवारात दिसत आहेत. त्यांनी कुर्ता घातला आहे, गळ्यात फुलांची माळ आणि कपाळावर टिळा लावला आहे. मित्र गेल्याचे दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. ते तिथे सतीश कौशिकसाठी प्रार्थना करण्यासाठी गेल्याचे सांगत आहे.

व्हिडिओ शेअर करताना त्यानी कॅप्शनमध्ये लिहिले की, “आज कोलकाता येथील कालीघाट मंदिरात मां कालीचे दर्शन घेतल्यानंतर मला कृतज्ञ वाटलं. देशाच्या अखंडतेसाठी आणि तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना केली. तसेच माझा मित्र सतीश कौशिक यांच्या आत्म्याला शांती लाभो यासाठी प्रार्थना केली. देशातील मंदिरांचा इतिहास आश्चर्यकारक आहे.

यापुर्वीही अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओद्वारे त्यांनी सांगितले, 'मी तुमच्याशी बोलत आहे कारण माझा मित्र सतीश कौशिक गमावल्यामुळे मी खूप दु:खी आहे आणि मला त्रास होत आहे. आम्ही 45 वर्षे मित्र होतो. त्याच्यासोबत राहण्याची सवय होती.'

अनुपम खेर आणि सतिश कौशिक यांची मैत्री ४५ वर्ष जुनी आहे. सतिश कौशिक यांचे जवळचे मित्र अनुपम खेर यांच्यासाठी त्यांचे निधन म्हणजे मोठा धक्का आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT