Anushka Sharma on Virat Kohli poor performance  esakal
मनोरंजन

Anurag Kashyap : 'विराट वाईट खेळल्यावर अनुष्काला कशाला बोलता?' अनुरागनं नेटकऱ्यांवर केली आगपाखड!

आपल्या आक्रमक भूमिकेमुळे आणि स्वभावामुळे अनुराग कश्यप हे नेहमची चर्चेत असतात.

युगंधर ताजणे

Anushka Sharma on Virat Kohli poor performance : लोकप्रिय भारतीय दिग्दर्शकांमध्ये अनुराग कश्यप यांचे नाव घ्यावे लागेल. गेल्या तीन दशकांहून अधिक अनुराग यांनी वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट तयार केले. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

आपल्या आक्रमक भूमिकेमुळे आणि स्वभावामुळे अनुराग कश्यप हे नेहमची चर्चेत असतात. आता तर त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माची बाजू घेत विराट कोहलीला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. यापूर्वी देखील अनुराग कश्यप हा त्याच्या प्रतिक्रियांमुळे चर्चेत आला आहे. त्यानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील अनेकदा आगपाखड केल्याचे दिसून आले होते.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

सेन्सॉर बोर्डावर देखील अनुरागनं आपला राग व्यक्त केला आहे. त्यानं त्यांना धारेवर धरत यामुळे कलाकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याची प्रतिक्रिया दिली होती. यामुळे पुन्हा एकदा अनुराग हा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

आता तो एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे त्यानं अनुष्काला नेटकऱ्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या होत्या त्यावरुन तो आक्रमक झाला आहे.

लोकांना बोलायला काय जाते, ते काहीही विचार न करता बोलत राहतात. आता भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात विराट खेळला नाही म्हणून अनुष्काला शिव्या देण्यात किंवा तिला ट्रोल करण्यात काय आनंद मिळतो लोकांना माहिती नाही.

अशा लोकांना आपण कितीही समजावून सांगितले तरी कळत नाही. ही एक वाईट प्रवृत्ती आहे अशी प्रतिक्रिया अनुरागनं दिली आहे.

लोकं त्यालाच नावं ठेवतात जो नेहमीच यशस्वी होत असतो. ही टीका केवळ आता क्रिकेटपर्यत राहिलेली नाही तर ती आता बॉलीवूडपर्यत देखील आली आहे. लोकांना आपण काय बोलतो आहोत हे कळत नाही.

विराटनं समजा एखाद्या सामन्यात प्रभावी कामगिरी नाही केली याचा अर्थ त्याच्या पत्नीला अनुष्काला बोलण्यात काय अर्थ आहे हेच कळत नाही. लोकांनी अजूनही या गोष्टींचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. असे अनुरागनं म्हटले आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT