Anurag Kashyap told taapsee pannu work with rohit shetty, read full story  Google
मनोरंजन

'तर तू रोहित शेट्टीकडे जा...'; असं रागात अनुराग कश्यप तापसीला का म्हणालेला?

'दोबारा' सिनेमाच्या मुलाखतीच्या निमित्तानं तापसी पन्नूनं अनुराग कश्यपविषयी अनेक खुलासे केले आहेत.

प्रणाली मोरे

Tappsee Pannu: तापसी पन्नूचा 'दोबारा'(Dobara) सिनेमा १९ ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. हा सिनेमा अनुराग कश्यपने(Anurag kashyap) दिग्दर्शित केला आहे. 'दोबारा' हा सिनेमा स्पॅनिश सिनेमा 'मिराज' चा रीमेक आहे. सिनेमाची निर्मिती एकता कपूरने केली आहे. तापसी पन्नूचा 'शाबाश मिठ्ठू' हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. पण सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस काही उतरला नाही. आता तापसी पन्नूने थ्रिलर सिनेमाच्या माध्यमातून लोकांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बनवला आहे. तापसीने नुकत्याच एका मुलाखतीत अनुराग कश्यपच्या एका वक्तव्याचा खुलासा केला आहे जो दिग्दर्शक रोहित शेट्टीशी संबंधित आहे. काय म्हणाला होता अनुराग कश्यप?(Anurag Kashyap told taapsee pannu work with rohit shetty, read full story)

तापसी पन्नू म्हणाली आहे, ''मी अनुराग कश्यपला म्हणाले की,मला स्टार बनायचं आहे तेव्हा तो माझ्यावर खूप रागावला. 'दोबारा' सिनेमाचं एडिटिंग सुरु होतं तेव्हा आमच्या दोघात खूप भांडण झालं. तेव्हा तो मला म्हणाला,'तु माझ्यासोबत का काम करतेस? जर तुला स्टार बनायचं आहे,तर जा आणि रोहित शेट्टीसोबत काम कर'. पण सगळ्यांचीच काम करण्याची पद्धत एकसारखी नसते''.

''मी स्टारडमसाठी एक वेगळ्या वाटेवरनं जाऊ इच्छिते. जर रोहित शेट्टी मला ती संधी देत नाहीत,तर मी काय करू? एक अभिनेत्री म्हणून मी फक्त इच्छाच करु शकते. मी एक कलाकार आहे आणि मला स्टार बनायचं आहे. मी माझ्या क्षमतेनुसार एक कलाकार होण्यासाठी जेवढं करावं लागतं तेवढं सगळं केलं. पण मी दिग्दर्शक नाही, निर्माता नाही. हे एक टीम वर्क आहे. मी अजून स्टार बनलेली नाही, नाहीतर माझा सिनेमा कसाही असला तरी मी प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणू शकले असते''. अनुराग कश्यपसोबत तापसीचा हा तिसरा सिनेमा आहे. याआधी तापसीने अनुराग सोबत 'मनमर्जिया' आणि 'सांड की आंख' सिनेमात काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT