anushka and vamika
anushka and vamika  Team esakal
मनोरंजन

वामिकाचा फोटो काढला, अनुष्का भडकली

युगंधर ताजणे

मुंबई - अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिच्या मुलीचा वामिकाचा (vamika) फोटो एकानं काढला. त्यानंतर ती त्या फोटोग्राफरवर चांगलीच भडकली आहे. दुसरीकडे तिलाही नेटक-यांनी यावरुन ट्रोल (Trolled) केले आहे. अनुष्का विराट सोबत मुंबई विमानतळावर दिसून आली. त्यावेळी तिचा फोटो घेण्यासाठी फोटोग्राफरची मोठ्या प्रमाणात झुंबड उडाली होती. मात्र यासगळ्याचा अनुष्काला मोठा राग आला. (anushka sharma questioned trolled on travelling with daughter vamika for cricket tournament during pandemic)

त्याचं झालं असं की, एका युझर्सनं (users) वामिकाचा फोटो घेतला. त्यामुळे ती त्याच्यावर भडकल्याचे दिसून आले. काही झालं तरी वामिकाचा फोटो सोशल (social media) मीडियावर येऊ द्यायचा नाही. असा निर्णय विराट आणि अनुष्कानं घेतला होता. फोटो काढणा-या त्या पापाराझीवर अनुष्का नाराज झाली. जोपर्यत वामिकाला सोशल मीडिया म्हणजे काही कळत नाही तोपर्यत तिचा फोटो सोशल मीडियावर येऊ द्यायचा नाही. असा प्रयत्न आमचा असेल. अशी भूमिका त्या दोघांनी घेतली आहे.

anushka trolled

विराट आणि अनुष्का दोघेही विमानतळावर (mumbai airport) येणार असल्याची माहिती काही फोटोग्राफर्सला लागली. त्यानंतर त्यांनी वामिकाचे फोटो कसे मिळतील याचा प्रयत्न सुरु केला. एका पापाराझीची नजर वामिकाकडे गेली. त्यानं घाईनं तिचे फोटो घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनुष्काला कमालीचा राग आला. मात्र यासगळ्या अनुष्का सर्वांच्या टीकेचाही विषय झाली आहे. अनेकांनी तिला ट्रोलही केले आहे.

वामिकाची एक झलकही आम्हाला पाहायला न मिळाल्यानं त्या दोघांचे चाहते नाराज झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांनी अनुष्काला नावं ठेवण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे काहींनी एका लहान मुलीला घेऊन अनुष्का विमानप्रवास कशी काय करु शकते? असा प्रश्नही काही ट्रोलर्सनं अनुष्काला विचारला आहे. लहान मुलासाठी घर जास्त सुरक्षित नाही का, असा प्रश्न त्यांनी या दोघांना विचारला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT