Appi Amchi Collector arjun propose appi in paragliding  sakal
मनोरंजन

Appi Amchi Collector: थेट आकाशात जाऊन प्रपोझ.. मराठी मालिकेत नवा प्रयोग

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत अर्जुन अप्पीला करणार अनोख्या पद्धतीने प्रपोझ..

नीलेश अडसूळ

Appi Amchi Collector: सध्या मराठी मालिका चांगल्याच गाजत आहेत. नावीन्यपूर्ण आशय, वेगवेगळ्या भाषा, ग्रामीण भागात चित्रीकरण असे बरेच प्रयोग मालिकांमध्ये सुरू आहेत. शेतातली प्रेमकथा, शहरातली प्रेमकथा, दोन राज्यातली प्रेमकथा अशा भन्नाट कथांनंतर आता एका पोलिसाची आणि कलेक्टरची लव्हस्टोरी म्हणजेच अर्जुन आणि अप्पीची लव्हस्टोरी झी मराठी वाहिनीवर सुरू आहे. लवकरच या मालिकेत अर्जुन अप्पीला प्रपोज करणार आहे. पण हा प्रपोज काहीसा वेगळा आहे. थेट आकाशात जाऊन अर्जुन अप्पीला प्रपोज करणार आहे.

(Appi Amchi Collector arjun propose appi in paragliding )

अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही ती मुलगी जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही.पण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे. तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे अप्पी आमची कलेक्टर. ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे.

येत्या १६ डिसेंबरला आपण पाहणार आहोत की अर्जुन अप्पीला एका रोमँटिक सफरीवर घेऊन जाणार आहे. पॅराग्लायडिंग करत अर्जुन अप्पीला प्रपोझ करणार आहे. ह्या विशेष भागाचं शूट पाचगणी भागात नुकतंच झालं. या पॅराग्लायडिंग शूटिंग दरम्यान अप्पी आणि अर्जुन खूप उत्साहित होते कारण त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील हा त्यांच्यासाठी एक नवीन आणि वेगळा अनुभव होता, अप्पी आमची कॉलेक्टर मालिकेची पूर्ण टीमच ह्या भागाच्या चित्रीकरणादरम्यान उत्साहित होती. मालिकेतील हा भाग अतिशय खास आणि महत्वाच्या भागांपैकी एक असणार आहे. ह्या विशेष भागाचे फोटोज व्हायरल होताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोधैर्य योजना काय आहे? सोलापूरमधील ९९ अत्याचार पीडित महिला, मुलींना १.११ कोटीचे ‘मनोधैर्य’; विधी सेवा प्राधिकरणाकडून मिळते कायदेशीर मदत मोफत

Shashikant Shinde: जनतेमुळेच माझे अस्तित्व अबाधित: प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; सध्याच्या राजकारणाचा जनतेला किळस वाटताेय

Pune Municipal Elections 2025: प्रभागरचना २०१७ प्रमाणेच; महापालिका निवडणूक, प्रारूप रचना सरकारला सादर

परीक्षेसाठी १०७ केंद्रे अन्‌ भरारी पथके अवघी तीन! वर्गातील CCTV कागदावरच; २३ सप्टेंबरपासून परीक्षा, अभियांत्रिकीची परीक्षा ३१ ऑक्टोबरपासून

Mahadev Munde case: २१ महिन्यांनंतर महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासाला वेग; एसआयटी प्रमुख पंकज कुमावतांनी घटनास्थळाची केली पाहणी

SCROLL FOR NEXT