Archana Puran Singh, Navjot Singh Sidhu  Google
मनोरंजन

पंजाबमध्ये सिद्धूच्या पराभवानं अर्चना हादरल्याचे मजेदार मीम्स व्हायरल

'द कपिल शर्मा' शो मध्ये अर्चना पुराण सिंग आधी जज च्या खुर्चीत नवजोत सिंग सिद्धु विराजमान होते.

प्रणाली मोरे

'द कपिल शर्मा'(The Kapil Sharma Show) शो मध्ये परिक्षकाच्या खुर्चीत बसून हसताना लोकांना घाबरवणारी अर्चना पुराण सिंग(Archana Puran Singh) सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रेन्डिंगमध्ये आहे. कारण आहे पंजाब विधानसभेत नवजोत सिंह सिद्धू(Navjot Singh SIdhu)चा दणकून झालेला पराभव. १० मार्च हा पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणूकांच्या निकालाचा दिवस नवजोत सिंह सिद्धुसाठी अनलकी ठरला तो निवडणुकीतील अपयशामुळे. पण यानंतर सोशल मीडियावर मात्र सिद्धू आणि अर्चना पुराण सिंग वर एकसे एक मीम्स पडत आहेत. मीम्सचा पूर आलाय असं म्हटलं तर अतिश्योक्ती ठरणार नाही. लोकं म्हणतायत, ''इतका मोठा दारुण पराभव झाल्यानंतर माजी क्रिकेटर सिद्धूचं राजकीय करियर तर संपल्यातच जमा आहे. पण एक खुर्ची आहे जी सिद्धूसाठी परफेक्ट सूट करते ती म्हणजे 'द कपिल शर्मा शो' मधील जजची खुर्ची''.

सिद्धूनं अनेक वर्ष 'द कपिल शर्मा शो' मध्ये जज म्हणून महत्त्वाची भूमिका निभावली आहे. सिद्धू शो मधनं बाहेर पडल्यानंतर अर्चना पुराण सिंगनं ती जबाबदारी पेलली आहे. कपिल पण अनेकदा अर्चनाला सिद्धुच्या परत येण्याची भीती दाखवत जोक मारत असतो. तर शो मधील इतरही कलाकार कधीतरी आपल्या स्कीटमधून अर्चनाला सिद्धूच्या परत येण्यावरनं टोमणे मारत असतात. पण आता सोशल मीडियावर राजकारणात सिद्धूला अपयश मिळाल्यानंतर तो कपिलच्या शो चा रस्ता धरेल यावरनं चांगलीच चर्चा रंगली आहे.

ट्वीटरवरील युजर्सचं म्हणणं आहे की, ''आता अर्चनावर संकटाचं सावट पसरलं आहे. कारण सिद्दधूचं पंजाबचा मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न तर धूळीस मिळालंय,तर आता तो छोट्या पडद्यावर परत येण्याचा विचार नक्कीच करेल. आणि त्यात त्याची पहिली नजर तर अर्चनाच्या खुर्चीवरच पडणार'' असे अंदाज लावले जातायत. सिद्धुनं विधानसभा निवडणुकीतील पराभव स्विकारला आहे पण भविष्यात पुढे काय पाऊल उचलणार याविषयीचं आपलं मत स्पष्ट केलेलं नाही. तसं पाहिलं तर,कपिल शर्मा च्या शो मध्ये असतानाच सिद्धु अनेकदा वादांमुळे संकटात सापडला होता. असो,सिद्धु आणि अर्चना यांच्यावरचे मजेदार मीम्स आम्ही बातमीत जोडले आहेत. नक्की पहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

SCROLL FOR NEXT