Arjun Kapoor tagged Malaika Arora in his pool pic on Instagram.  Google
मनोरंजन

अर्जुननं थेट सोशल मीडियावर मलायकाला विचारला 'बोल्ड प्रश्न'

अर्जुननं आपला शर्टलेस फोटो मलायकाला टॅग करीत हा प्रश्न विचारला आहे.

प्रणाली मोरे

अर्जुन कपूर(Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा(Malaika Arora) यांनी जेव्हापासनं जाहिर केलंय की ते दोघे रीलेशनशीपमध्ये आहेत तेव्हापासनं त्यांच्यातील प्रेम अधिकाधिक वाढतानाच आपण पाहिलं असेल. मग कुठल्याही सेलिब्रेशनच्या निमित्तानं त्यांनी केलेल्या पोस्ट असोत,त्यांचे एकमेकांसोबतचे फोटो असोत,किंवा मग त्यांनी एकत्रित एन्जॉय केलेल्या व्हॅकेशन असोत सारेच त्यांच्यातील मजबूत नात्याची साक्ष देत असतात. सोशल मीडियावर ते दोघेही सक्रिय आहेत. त्यामुळे अनेकदा त्यांचे छानछान फोटो पहायला मिळतात. नुकताच अर्जुननं त्याचा एक फोटो मलायकाला टॅग केलाय ज्याची जोरदार चर्चा रंगलीय. (Arjun Kapoor & Malaika News)

अर्जुननं मलायकाला जो फोटो टॅग केला आहे त्यात तो स्वीमिंग पूलमध्ये शर्टलेस दिसत आहे. त्या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं आहे की,''अखेर मी माझी पाठ कशी दिसते हे पाहू शकलो''. त्यानं या फोटोत कॅमेऱ्यासाठी स्टायलिश पोझ दिली आहे. त्यानं त्याचे दोन्ही हात आपल्या डोक्यावर मागनं ठेवले आहेत ज्यामुळे त्याच्या बॉडीचा शेपही मागनं परफेक्ट दिसत आहे.

Arjun Kapoor shared a picture on Instagram Stories.

अर्जुननं त्याची ही फोटो पोस्ट मलायकला इन्स्टाग्रामवर टॅग केली आहे. तिनं अद्याप त्यांवर काही प्रतिक्रिया दिली नसली,तरी ती काय बोलतेय याकडे चाहत्यांचं लक्ष मात्र लागून राहिलं आहे. तिकडे मलायकानं तिचा स्टायलिश समर सिझन लूक दाखवणारा एका फोटो पोस्ट करत लिहिलंय,''समर सुरू झाला...' त्या फोटोत ती रस्त्यावर चालताना दिसतेय. तिनं पांढऱ्या रंगाचा ऑफशोल्डर टॉप आणि हॉट पॅंट घातली आहे. या फोटोत तिच्या चेहऱ्यावरचं स्माईल अनेकांना घायाळ करून जाईल हे नक्की. या फोटोवर तिची मैत्रिण सीमा खाननं फायर इमोजी पोस्ट केलाय.

अर्जुन आणि मलायका अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात. पण तेव्हा अर्जुन प्रत्येकवेळेला मलायकाच्या मागे खंबीरपणे उभा दिसला आहे. त्यानं असे एकदा मुलाखातीत बोलूनही दाखवले होते की,''जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही एकमेकांच्या मागे खंबीरपणे उभे असतो. त्यानं त्यांच्या एज गॅपवरही आपलं मत स्पष्ट करताना म्हटलं होतं की ही एक क्षुल्लक गोष्ट आहे,जी आमच्यासाठी महत्त्वाची नाही. आम्ही एकमेकांचा आदर करतो, आणि एकमेकांवर त्याहीपेक्षा अधिक प्रेम करतो''.

अर्जुननं नुकतेच त्याच्या कुत्ते सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. एक व्हिलन रीटर्न्स या सिनेमातही तो महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तर दुसरीकडे मलायाका रिअॅलिटी शोची परिक्षक म्हणून नेहमीच दिसत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT