arun nalawade spoke about marathi bhasha in sakal podcast interview
arun nalawade spoke about marathi bhasha in sakal podcast interview sakal
मनोरंजन

पालकच इंग्रजीचे संस्कार करत असतील तर 'मराठी' टिकेल कशी? अरुण नलावडे भडकले

नीलेश अडसूळ

Arun nalawade : नाटक, मालिका आणि चित्रपट अशा मनोरंजनाच्या तीनही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेले ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत मनोहर देशपांडे ही भूमिका साकारत आहेत. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. सध्या ही मालिका अत्यंत रंजक वळणावर आहे. दीपूचा झालेला उपघात, इंद्राने तिच्यासाठी लावलेली जीवाची बाजी आणि या सगळ्यात बाप म्हणून दीपूच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे मनोहर देशपांडे अशा एकास एक संगतीने प्रेक्षक अवाक झाले आहेत. आता दीपूचे बाबा इंद्रा आणि दीपूमधील प्रेम ओळखू शकतील का, त्यांना पाठिंबा देतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच निमित्ताने अरुण नलावडे सकाळ 'अनप्लग' या पॉडकास्ट मध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मराठी भाषे बाबतची मनातील नाराजी बोलून दाखवली. (arun nalawade exclusive interview in sakal podcst)

गेली काही वर्षे मराठी भाषेचा मुद्दा वारंवार पुढे येत आहे. मराठी भाषा टिकवी, ती जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. पण तरीही मराठी भाषेला हवा तसा बहुमान मिळत नाही. विशेष करून मराठी साहित्य, नाटक यामध्ये मराठी तरुण मुले बरीच मागे आहेत. याबाबत अखेर अरुण नलावडे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे, मराठी भाषा का पुढे जात नाही याचे मूळ आपल्या घरातच आहे असे ते सांगतात. शिवाय याला पालक जबाबदार असल्याचेही ते म्हंटले आहे. भाषेच्या मुद्द्यावर त्यांनी मांडलेले विचार अत्यंत परखड आणि प्रभावी आहेत. या शिवाय भाषा टिकण्यासाठी काय करायला हवं, कशा कलाकृती निर्माण करायला हव्या अशा अनेक मुद्यांवर त्यांनी भाष्य केले आहे. हे जर तुम्हाला सविस्तर ऐकायच असेल तर सकाळ पॉडकास्ट ऐकावं लागेल. ज्याची लिंक खाली जोडली गेली आहे. (arun nalawade spoke about marathi bhasha in sakal podcast interview)

या मुलाखतीच्या निमित्ताने मनोरंजन विश्वातील त्यांचे अनुभव आणि काही खटकणाऱ्या बाजू यावर अरुण नालावडे यांनी दिलखुलास संवाद साधला आहे. विशेष म्हणजे नाटक, मालिका आणि तरुण कलाकार यावर ते भरभरून बोलले आहेत. याशिवाय कलाकृती कशा असाव्यात, सामाजिक भान कसे जपावे, संस्कृतीम संस्कार याविषयीही महत्वपूर्ण संवाद त्यांनी साधला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विभव कुमार यांना आजच कोर्टासमोर हजर केलं जाणार

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, दु:ख सहन न झाल्याने सहकलाकारानेही संपवलं जीवन!

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

SCROLL FOR NEXT