Asha Bhosale and Mahesh Tilekar
Asha Bhosale and Mahesh Tilekar 
मनोरंजन

मोदींच्या "मॉं की रसोई'मध्ये  आशा भोसले, महेश टिळेकर 

सकाळ वृत्तसेवा


पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील पहिले न्यूट्रिशन पार्क गुजरातमध्ये साकारत आहे. यामध्ये मुलांसाठी विविध स्टेशन असतील. या प्रत्येक स्टेशनवर मुलांची छोटी ट्रेन थांबून तिथे असलेल्या खेळ, दूध नगरी, फलाहार, विज्ञान अशा विविध विभागांत त्या त्या संदर्भात मनोरंजनातून मुलांना माहिती दिली जाणार आहे. या सर्व विभागांसाठी क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून "मॉं की रसोई'साठी मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी हिंदी गीत लिहिले आहे. संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत गायिका आशा भोसले यांनी गायिले आहे. 

टिळेकर यांची संकल्पना, दिग्दर्शन असलेल्या या गाण्यात ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान आज्जीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. "पान खाये सय्या हमारो' हे गाणे आशाताईंनी रेहमान यांच्यासाठी गायले होते. या वेळी पुन्हा एकदा 86 वर्षांच्या आशाताई, 82 वर्षांच्या वहिदा रेहमान यांच्यासाठी टिळेकर यांनी लिहिलेल्या "मॉं की रसोई' या गीतासाठी 50 वर्षांनंतर गाणार आहेत.

बर्ड फ्लू, चिकुनगुनियासाठी टिळेकर यांनी काही वर्षांपूर्वी तयार केलेली गाणी लोकप्रिय होऊन त्याची "लिम्का बुक'मध्ये नोंद झालेली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT