Ashneer Grover, Ashneer Grover news, Ashneer Grover roadies 19,  SAKAL
मनोरंजन

Ashneer Grover: शार्क टँकनंतर अश्निर ग्रोव्हरचं पुन्हा टिव्हिवर कमबॅक.. या शोमध्ये स्पर्धकांची करणार हवा टाईट

अश्नीर ग्रोवर 'शार्क टँक इंडिया 2' चा असा प्रश्न अनेकांना पडला. पण आता अश्नीर ग्रोव्हर पुन्हा टीव्हीवर परतला आहे

Devendra Jadhav

Ashneer Grover News: 'शार्क टँक इंडिया'च्या पहिल्या सीझनपासून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अशनीर ग्रोव्हर दुसऱ्या सीझनमध्ये चाहत्यांना न दिसल्याने अनेकांची निराशा झाली.

अश्नीर ग्रोवर 'शार्क टँक इंडिया 2' चा असा प्रश्न अनेकांना पडला. पण आता अश्नीर ग्रोव्हर पुन्हा टीव्हीवर परतला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अश्नीर ग्रोव्हरने 'शार्क टँक इंडिया' सोबत नाही तर 'रोडीज' सोबत पुनरागमन केले आहे.

तो आता 'रोडीज 19: कर्म या कांड'मध्ये दिसणार आहे. निर्मात्यांनी नुकताच त्याचा प्रोमो रिलीज केला, ज्यामध्ये अश्नीर ग्रोव्हर दिसला.

(ashneer grover comback in television by roadies 19 after he left shark tank india )

'रोडीज 19'मध्ये अश्नीर ग्रोवरला पाहून चाहते हैराण झाले असून ते सोशल मीडियावर विविध प्रश्न विचारत आहेत.

रोडीज 19: कर्म या कांडच्या निर्मात्यांनी जारी केलेल्या प्रोमोमध्ये, अश्नीर नवीन टोळी नेत्यांसोबत दिसत आहे. सोबत अभिनेता सोनू सूद सुद्धा दिसतोय.

'रोडीज: कर्म या कांड'मध्ये यावेळी रिया चक्रवर्ती, प्रिन्स नरुला आणि गौतम गुलाटी हे कलाकार सहभागी होणार आहेत. हा प्रोमो ऑडिशन राउंडचा आहे.

स्पर्धक मुलाखतीसाठी येतात तेव्हा त्यांना आपल्या टीममध्ये घेण्यासाठी टीम लीडरमध्ये चर्चा सुरु होते.

तत्पूर्वी, सोनू सूद, अश्नीर ग्रोव्हरसह, एक 'स्पर्धक लिलाव' फेरी असेल, ज्यामध्ये स्पर्धकांचा लिलाव सुरू होईल अशी घोषणा करण्यात येईल. यानंतर, स्पर्धक एक एक करून प्रवेश करतात आणि सर्व नेते त्यांच्यासाठी बोली लावू लागतात.

एका सीनमध्ये अश्नीर ग्रोवर "भीक मागायची असेल तर मला घेऊन जा", असं म्हणताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून अश्नीर ग्रोव्हरचे चाहते आश्चर्यचकित झाले असून नाराजी व्यक्त करत आहेत.

एका चाहत्याने प्रोमोवर टिप्पणी केली, 'अशनीर ग्रोव्हर हे खूप धक्कादायक आहे. काय करत आहात? एका यूजरने लिहिले की, 'हे काय आहे? अश्नीर इथे काय करतोय?' 'अशनीर हे खूपच धक्कादायक आहे' अशी आणखी एका यूजरची कमेंट आहे.

आता अशनीर ग्रोव्हर रोडीजमध्ये सहभागी होऊन स्पर्धकांचं दोगलापन कसं उतरवणार हे पाहणं कुतूहलाचा विषय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईत बेशिस्तपणा वाढला... राज ठाकरेंनी का घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट? सादर केला मुंबईचा विकास आराखडा

Gadchiroli Flood: पूरग्रस्त गडचिरोलीत हाहाकार; मुख्याध्यापकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

Temghar Dam : टेमघर धरणग्रस्तांना दोन महिन्यांत मोबदला; न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षा

Mother Daughter Drown : दुर्दैव! मुलीला बुडताना पाहून आई वाचवायला गेली अन् दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ

Birla Group: कुमार मंगलम बिर्ला स्वस्तात शेअर्स का विकत आहेत? एका वर्षापूर्वीच खरेदी केली होती कंपनी

SCROLL FOR NEXT