ashram web series  second season
ashram web series second season  
मनोरंजन

आश्रम वेबसीरिज मालिका पुन्हा वादाच्या भोव-यात ; जोधपूरमध्ये तक्रार दाखल 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेली वेबसीरीज आश्रम पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडली आहे. सध्या या मालिकेचा 2 सीझन प्रदर्शित झाला आहे. गेल्या वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही मालिका रिलीज करण्यात आली होती. तेव्हापासून तिच्यामागे वाद सुरु झाला. समाजातील अनिष्ठ रुढी परंपरा यांना शस्त्र बनवून त्याचा वापर करणा-या भोंदू बाबांचा बुरखा फाडण्याचे काम या मालिकेनं केले आहे.

जेव्हापासून ही मालिका प्रसिध्द झाली तेव्हापासून ती कोणत्या ना कोणत्या कारणासाठी वादात सापडली आहे. मागील वर्षी झालेल्या बिहारच्या निवडणूकांच्या दरम्यानही या मालिकेतील काही मुद्दे प्रकाशात आले होते. आता जोधपूरमध्ये या मालिकेच्या निर्मांत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 नोव्हेंबर मध्ये आश्रम मालिकेचा 2 सीझन मॅक्स प्लेयरवर प्रदर्शित झाला होता. त्यात बॉबी देओलनं एका भोंदूबाबाची भूमिका साकारली होती. पहिल्या भागावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. 

राजस्थानातील जोधपूर भागातील अनुसुचित जाती जमातीच्या कायद्यानुसार पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. यावेळी देखील धार्मिक भावना दुखावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. एएनआयच्या रिपोर्टनुसार, गुरुवारी जोधपूरमधील एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक सीताराम पवार म्हणाले की, मालिकेच्या पहिल्या भागात एससी आणि एसटी समुहाच्या भावना दुखावल्या आहेत. तक्रार आल्यावर आम्ही गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी डी आर मेघवा यांनी असे म्हटले आहे की, ही मालिका जाती भेदभावाचे समर्थन करते. तसेच त्यात एका जातीचा अपमान करण्यात आला असून तक्रार दाखल करण्यात आली आहे. डिसेंबर 2020 मध्ये जोधपूर कोर्टानं बॉबी देओल आणि प्रकाश झा यांना आणखी एका प्रकरणात नोटीस पाठविण्यात आली होती. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT