sambhaji maharaj, chhatrapti sambhaji maharaj, tulapur, ashwini mahangade
sambhaji maharaj, chhatrapti sambhaji maharaj, tulapur, ashwini mahangade SAKAL
मनोरंजन

Ashwini Mahangade: छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाली, हात जोडताच रडू आलं

Devendra Jadhav

Ashwini Mhangade News: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) फेम अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर तिच्या विविध पोस्ट्स मधून चर्चेत असते. अनघा अभिनय क्षेत्रात यशस्वी आहेच शिवाय ती सामाजिक भान सुद्धा जपणारी आहे.

अश्विनी तिच्या रयतेचं स्वराज्य संस्थान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. अश्विनी नुकतीच छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी गेलेली. तिथे आलेला भावुक अनुभव तिने सांगितला.

(ashwini mahangade emotional post about Chatrapati Sambhaji Maharaj)

अश्विनी तिच्या रयतेचं स्वराज्य संस्थान प्रतिष्ठान मधील काही सहकाऱ्यांसह तुळापूर येथील शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळी गेली होती. तिथे जाऊन अश्विनी संभाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाली.

या अनुभवाबद्दल अश्विनी लिहिते,"छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळी जावून रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे सदस्य, पदाधिकारी नतमस्तक झाले. भावना साधी, सोप्पी होती की पुढील काळात आमच्याकडून चांगले काम व्हावे. आमच्या मनात शिवविचार रुजावा.

अश्विनी पुढे सांगते, "आम्ही सगळेच भावूक झालो होतो. तिथली माती, हवा आणि इंद्रायणी,भीमा,भामा नद्यांचा त्रिवेणी संगम साक्ष देतात आमच्या छत्रपतींनी आमच्यासाठी केवढे मोठे बलिदान दिले.

बलिदान मास येतो तेव्हा हजारो, लाखो शिवभक्तांच्या आणि शंभूभक्तांच्या उरात धडकी भरते. कसं सोसल आमच्या राजाने हे सगळे. सर्व ग्रामस्थांचे मनपुर्वक धन्यवाद जे प्रतिष्ठान चे काम पाहतात आणि कौतुकही करतात."

अशाप्रकारे अश्विनीने शुटिंगमधून वेळात वेळ काढत तिच्या संस्थेच्या सहकारी मित्रांसोबत तुळापूरला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळी गेली होती. अश्विनी सध्या आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे.

सासू अरुंधतीच्या मागे भक्कमपणे उभी असणारी सून म्हणून अनघाचं कौतुक होतंय. याआधी अश्विनीने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत संभाजी महाराजांची बहीण राणूआक्कांची भूमिका साकारली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT