aush.jpg
aush.jpg 
मनोरंजन

आयुषमान खुरानाने पाकिस्तानला झापले

वृत्तसंस्था

मुंबई : सध्या भारत आणि पाकिस्तान यांचा प्रत्येक पातळीवर शाब्दिक संघर्ष सुरु आहे. त्याचेच पडसाद आता बाॅलिवूडमध्ये देखील उमटत आहेत. पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली होती. यावरूनच आयुषमान खुरानाने प्रियांकाला पाठिंबा देत पाकला झापले आहे.  

दरम्यान, पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी यांनी युनिसेफला पत्र लिहून प्रियांका चोप्राला ‘सदिच्छा दूत’ या पदावरुन हटवण्याची विनंती केली होती. बॉलिवूडमधील अभिनेते जावेद अख्तर आणि अभिनेत्री कंगना रणौतने प्रियांका चोप्रा भारताचे प्रतिनिधीत्व योग्य पद्धतीने करत आहे असे वक्तव्य करत तिला पाठिंबा दिला आहे. आता अभिनेता आयुषमान खुरानाने देखील प्रियांकाला पाठिंबा दिला आहे.

आयुषमानला ‘अंधाधून’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी त्याने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीदरम्यान आयुषमानने ‘प्रियांका आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व खूप चांगल्या प्रकारे करत आहे. ती केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी एक आदर्श आहे. एका लष्कर अधिकाऱ्याची मुलगी असण्याच्या नात्याने ती भारताचे प्रतिनिधीत्व खूप चांगल्या प्रकारे करत आहे’ असे आयुषमान म्हणाला आहे.

प्रियांका चोप्राने काश्मीर प्रश्नी भारत सरकारच्या भूमिकेचे तसेच पाकिस्तानला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देण्याचे जाहीर समर्थन केले होते. तिने युनिसेफची सदिच्छा दूत या नात्याने शांततेचा पुरस्कार केला पाहिजे. पण तिची भूमिका या तत्वांच्या पूर्णपणे विरोधात आहे. त्यामुळे तिला या पदावरुन हटवावे अशी मागणी शिरीन मझारी यांनी आपल्या पत्रातून केली आहे. काही दिवसांपूर्वी काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर आयशा मलिका या पाकिस्तानी महिलेने लॉस एंजल्स येथील कार्यक्रमात प्रियांका चोप्राला ढोंगी म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT