prabhas and kriti sanon Sakal
मनोरंजन

Prabhas-Kriti Sanon: सिड कियारानंतर क्रिती आणि प्रभास मालदीवमध्ये करणार एंगेजमेन्ट? माहिती आली समोर

क्रिती सेनेन आणि बाहुबली फेम अभिनेता प्रभास यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर अली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचे कालच म्हणजे 7 फेब्रुवारीला लग्न झाले आहे. दरम्यान, क्रिती सेनेन आणि बाहुबली फेम अभिनेता प्रभास यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर अली आहे. चित्रपट समीक्षक उमेर संधूने अलीकडेच एका ट्विटमध्ये दावा केला आहे की, क्रिती सेनन आणि प्रभास एंगेजमेंट करणार आहेत.

उमेर संधूने नुकतेच ट्विट केले, “ब्रेकिंग न्यूज, क्रिती सेनेन आणि प्रभास पुढील आठवड्यात मालदीवमध्ये एंगेजमेंट करणार आहेत. त्यांच्यासाठी खूप आनंद झाला मला." उमेर संधूच्या या ट्विटची सध्या बरीच चर्चा आहे. मात्र, या दाव्यात कितपत तथ्य आहे, याबाबत काहीही सांगणे कठीण आहे.

प्रभास आणि क्रिती पहिल्यांदाच आदिपुरुष चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. दोघांनी एकाच चित्रपटात काम करायला सुरुवात केली तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरची चर्चा आहे. मात्र, काही काळापूर्वी क्रिती सेननने प्रभाससोबतच्या अफेअरच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या.

ती म्हणाली होती की ना हे प्रेम आहे ना पीआर. प्रभासनेच एका मुलाखतीत डेटिंगच्या वृत्ताचे स्पष्ट खंडन केले होते. या सर्व जुन्या बातम्या असल्याचे त्यांनी सांगितले होते.

उमेर संधूच्या या दाव्यानंतर ट्विटर यूजर्सनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका यूजरने लिहिले की, "काही वर्षांपूर्वी तुम्ही म्हणाला होता की प्रभास आणि अनुष्का जानेवारी 2018 मध्ये लग्न करणार आहेत." एकाने लिहिले की, "विचित्र गोष्ट म्हणजे फक्त क्रिती सेनन आणि प्रभास यांनाच या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नाही."

एका युजरने खुद्द उमेरला प्रश्न केला. त्याने विचारले, “बरं, हे तुला कोणी सांगितलं? प्रभास की क्रिती सेनन? तुम्हाला एंगेजमेन्टचे आमंत्रण मिळाले आहे का? फक्त त्याचा स्क्रीनशॉट दाखवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT