Maisaheb Savita Ambedkar Announcement of the film
Maisaheb Savita Ambedkar Announcement of the film sakal
मनोरंजन

माईसाहेब सविता आंबेडकर यांच्यावर चित्रपटाची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : माईसाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माईसाहेब सविता आंबेडकर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर खरेच विषप्रयोग झाला होता काय? या प्रश्‍नाचा शोध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे. यासंदर्भात मीराताई आंबेडकर यांची मुलाखत या चित्रपटात असेल. ॲड. बाळासाहेब आंबेडकर, रामदास आठवले, गंगाधर गाडे तसेच माईसाहेब यांचा सहवास लाभलेले विजय सुरवाडे व इतर मान्यवरांच्या मुलाखती या चित्रपटामध्ये असतील.

चा. भ. खैरमोडे, धनंजय कीर, सोहनलाल शास्त्री, नानकचंद रत्तू तसेच माईसाहेब लिखित ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’ या ग्रंथाचा तत्कालीन वर्तमानपत्रे, नियतकालिके, सरकारी अहवाल यांचा संदर्भ घेऊन या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली आहे. डॉ. जब्बार पटेल यांचेही मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. माहितीपट आणि चित्रपट या दोन्हींचा समन्वय साधून निर्मिती केली जाणार आहे. लवकरच तंत्रज्ञ आणि कलावंत यांची निवड केली जाणार आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि लेखक प्रकाश त्रिभुवन आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT