Babita Has Reunited With Husband, Randhir Kapoor After 35 Yrs Of Separation, what Kareena Kapoor and Karisma Kapoor think about it sakal
मनोरंजन

Randhir kapoor: अखेर 35 वर्षांनी रणधीर कपूर आणि बाबिता एकत्र! घटस्फोटाविना राहिले होते विभक्त..

बॉलीवुड मधल्या गाजलेल्या रणधीर- बबिता प्रकरणाचा अखेर हॅप्पी एंडिंग..

नीलेश अडसूळ

Randheer kapoor and babita reunited: अभिनेत्री करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांचे आई-वडील म्हणजेच बबिता कपूर आणि रणधीर कपूर यांच्या नात्याविषयी कायमच बॉलीवुडमध्ये चर्चा होत आली आहे. त्यांचे कारणही तसेच आहे. लग्नाच्या 17 वर्षांनी दोघांनीही वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आणि जवळपास ते 35 वर्षे विभक्त राहिले.

पण एक आनंदाची बातमी म्हणजे त्या दोघांनी म्हणजेच बबिता आणि रणधीर कपूर यांनी 35 वर्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. करीना आणि करिश्मा साठी तर मोठी आनंदाची पर्वणीच असणार आहे.

माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, ते दोघेही त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी एकत्र राहत आहेत. आणि विशेष म्हणजे या निर्णयाबद्दल करीना आणि करिश्मा दोघीही प्रचंड आनंदी असल्याचे समोर येत आहे.

(Babita Has Reunited With Husband, Randhir Kapoor After 35 Yrs Of Separation, what Kareena Kapoor and Karisma Kapoor think about it)

या आहे रणधीर - बबिताची गोष्ट..

रणधीर कपूर आणि बबिता यांची पहिली भेट १९६९ मध्ये आलेल्या ‘संगम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून दोघांची एकमेकांची ओळख झाली आणि नंतर हळूहळू त्यांच्यात भेटीगाठी वाढत गेल्या. परंतु त्यावेळी रणधीर यांच्या मनात लग्नाचा कोणताच विचार नव्हता ते केवळ टाइमपास करत होते.

पण झाले उलटेच. हे प्रकरण त्यांचे वडील राज कपूर यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी थेट बाबीता यांच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. आणि घरच्यांच्या सांगण्यावरून त्यांनी ६ नोव्हेंबर १९७१ रोजी लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर त्यांना करिष्मा आणि करीना या दोन मुली झाल्या. त्यावेळी बबिता यांनी चित्रपटात काम करणं थांबवलं होतं. पुढे ८०च्या दशकात रणधीर कपूर यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकत नव्हते. त्यांचा कारकिर्दीचा आलेख खाली घसरत होता. त्यामुळे ते खूप अस्वस्थ झाले. दारूच्या आहारी गेले. याचा रणधीर यांच्या प्रकृतीवरही परिणाम होऊ लागला, अनेकदा बाजावूनही सुधारणा होत नसल्याने बबिता आणि रणधीर यांच्यात कायम खटके उडायचे आणि अखेर एक दिवस बबिता यांनी आपल्या दोन्ही मुलींना घेऊन वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.

लग्नाला 17 वर्षे झालेली असताना ते वेगळे झाले पण त्यांनी आजवर घटस्फोट घेतला नाही. दोघांनी आपापल्या पद्धतीने मुलींना वाढवले, त्यांच्यावर संस्कार केले. आणि अखेर आयुष्याच्या संध्याकाळी त्यांनी 35 वर्षांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT