Raja Chaudhary and  Shweta Tiwari
Raja Chaudhary and Shweta Tiwari esakal
मनोरंजन

"लग्नाबाबत श्वेताचं नशिबच खराब"

प्रियांका कुलकर्णी

हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री श्वेता तिवारी Shweta Tiwari सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. श्वेताचे 23 डिसेंबर 1998 रोजी राजा चौधरीशी Raja Chaudhary लग्न झाले. 2007 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर श्वेताने अभिनव कोहलीशी Abhinav Kohli लग्न केले. पण मतभेदांमुळे त्यांचा 2019 मध्ये घटस्फोट झाला. काही दिवसांपूर्वी श्वेता 'खतरों के खिलाड़ी 11' या शोच्या शूटिंगसाठी केपटाउनला गेली. आपल्या चार वर्षांच्या मुलाला एकटं सोडून ती शूटिंगला गेल्याचा आरोप पूर्वाश्रमीचा पती अभिनवने केला. पण श्वेताने अभिनवच्या या आरोपावर सडेतोड उत्तर दिले. या सर्व गोष्टींवर आता राजाने प्रतिक्रिया दिली आहे. (Bad luck her second marriage too has failed said Shweta Tiwaris ex husband Raja Chaudhary)

एका मुलाखतीत राजाने सांगितले, "श्वोताचे कोणतेच लग्न फार काळ टिकले नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की ती वाईट आहे. श्वेता चांगली पत्नी आणि आई आहे. तिच्या दोनही पतींबद्दल अशा गोष्टी घडल्यामुळे तिच्याबद्दल लोक वेगळा विचार करत आहेत. पण नशिब खराब असल्यामुळे तिचे दुसरे लग्नदेखील टिकले नाही. या गोष्टीमुळे ती वाईट किंवा चुकीची व्यक्ती आहे असं आपण म्हणू शकत नाही." तसेच राजाने हेही सांगितले की, अभिनव आणि श्वेतामधील वादांविषयी तो काहीच करू शकत नाही. पण राजाचे असे मत आहे की श्वेताने अभिनवला त्याच्या मुलाला भेटण्यास नकार देऊ नये.

अभिनवने श्वेतावर केलेल्या आरोपांनंतर श्वेताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अभिनव त्यांच्या मुलाला श्वेताकडून हिसकावून घेताना दिसत होता. श्वेताने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला. पण अभिनवने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून सांगितले, की श्वेता त्याच्या मुलाला भेटण्यास नकार देत आहे. त्यानंतर श्वेताला अनेकांनी ट्रोल केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT