Bade Miyan Chote Miyan esakal
मनोरंजन

Bade Miyan Chote Miyan: अक्षय अन् टायगर श्रॉफच्या प्रमोशन सोहळ्यात 'चपलांचा पाऊस'; पाहा व्हिडीओ

Bade Miyan Chote Miyan:बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय आणि टायगर हे लखनौमध्ये (Lucknow) पोहोचले होते.

priyanka kulkarni

Bade Miyan Chote Miyan: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हे सध्या त्यांच्या बडे मियाँ छोटे मियाँ (Bade Miyan Chote Miyan) या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय आणि टायगर हे लखनौमध्ये (Lucknow) पोहोचले होते. यावेळी दोघेही स्टंट करत स्टेजवर आले. अक्षय आणि टायगर स्टेजवर आल्यानंतर चाहत्यांनी स्टेजजवळ जाण्यासाठी बॅरिकेड तोडले. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी केला लाठीचार्ज

बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यादरम्यान अनेकांनी स्टेजच्या दिशेने चप्पल आणि दगड फेकण्यास सुरुवात केली.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या इव्हेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अक्षय आणि टायगरला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे. काही चाहत्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. जमावाने दगडफेक करण्यास सुरुवात केली. पोलीस अनियंत्रित जमावाला नियंत्रित करताना दिसत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ:

कधी रिलीज होणार बडे मियाँ छोटे मियाँ?

बडे मियाँ छोटे मियाँ हा चित्रपट 8 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत टायगर श्रॉफ, मानुषी छिल्लर आणि आलिया एफ आणि सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Market Alert : IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे? या आठवड्यात शेअर बाजारात खुले होणार 6 नवे IPO; जाणून घ्या कधी आणि कोणते?

Parli Nagar Parishad Election: परळी नगर पालिकेत राष्ट्रवादीच्या आघाडीतून MIM बाहेर; सत्तास्थापनेनंतर नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : अंकुश नगर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

Pune News : गणेश बिडकरांनी ओलांडला वीस लाख पावलांचा टप्पा; ६० हजार नागरिकांशी सहा महिन्यांत तीनदा थेट संपर्क

Apple Nutrition: लाल की हिरवे सफरचंद? जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते फायदेशीर

SCROLL FOR NEXT