Sai Tamhankar 
मनोरंजन

Sai Tamhankar: सई ताम्हणकरचा बॉलिवूडमध्ये दबदबा कायम; 'भक्षक'ची सर्वत्र चर्चा!

Sai Tamhankar: भक्षक या चित्रपटामधल्या "जस्मीत गौर" या एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारून सई प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sai Tamhankar: अभिनेत्री सई ताम्हणकरनं (Sai Tamhankar) मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील विशेष स्थान निर्माण केलं आहे. सई आता ओटीटी प्लॅटफॉर्म वर झळकली.सईनं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील "भक्षक " या चित्रपटामधून सई प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भक्षक या चित्रपटामधल्या "जस्मीत गौर" या एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारून तिने प्रेक्षकांना मोहित करून आपला अभिनय अगदी चोख पणे दाखवून दिला आहे.

सईच्या भूमिकेचं होतंय कौतुक

भूमी पेडणेकर , सई ताम्हणकर आणि संजय मिश्रा यांच्या मुख्य भूमिका असलेला भक्षक हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आणि सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने सगळ्यांना एक खास संदेश सुद्धा दिला. सईने आजवर वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आणि स्त्री सक्षमीकरण असलेल्या तिच्या आजवरच्या अनेक भूमिकांतून आपण सगळ्यांनी तिला पाहिलं. या चित्रपटात तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक केलं जातंय हे देखील तितकच खरं!

भक्षक या चित्रपटात जस्मीत गौर ही भूमिका प्रेक्षकांना आपलंसं करणारी ठरली आहे आणि म्हणून सईने पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित केलं आहे. या चित्रपटात अनेक बड्या कलाकारांच्या सोबतीने काम करून सई ने आपला अभिनय अगदी सहजतेने पार पाडला आहे. तिच्या या खास भूमिकेचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय.

अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारावर आधारित चित्रपट

अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय आणि अत्याचार यामुळे त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते यावर भक्षक या चित्रपटातून भाष्य करण्यात आल असून भक्षक मध्ये एक पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणारी सई अव्वल ठरली आहे.

सईने पहिल्यांदा रेड चिली एंटरटेनमेंट सोबत हा खास प्रोजेक्ट केला असून भविष्यात सई अजून दर्जेदार काम करणार आहे. 2024 वर्षातला सईचा हा दुसरा प्रोजेक्ट्स आणि तो सुद्धा नेटफ्लिक्स सोबत असल्याने खास ठरला. आगामी काळात सई ताम्हणकर अजून काय दमदार काम करणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 MI vs RCB : मुंबई इंडियन्स उद्या न खेळताच स्पर्धेबाहेर होणार? महत्त्वाचे अपडेट्स, RCB विरुद्धच्या लढतीपूर्वी वातावरण बिघडले

Crime: तोंडात कापड कोंबले, हातपाय दोरीने बांधले, महिलेला निर्घृणपणे संपवले, २ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, नेमकं काय घडलं?

SSC Topper Story:गरिबी, संघर्ष आणि आईच्या कष्टांवर मात करत मानसी बागुलची दहावीत ९८.२० टक्के झेप

Tamil Nadu Politics: मोठा यू-टर्न! आधी 'त्या' अटींनी वाढवला तिढा; आता VCK कडून TVK ला बिनशर्त पाठिंबा, तमिळनाडूत राजकीय नाट्य

जिंकलंस पोरा...! साताऱ्याच्या साहिल जाधवने Archery World Cup मध्ये जिंकलं पदक; आईने स्वतःचे दागिने विकून घेऊन दिलेला धनुष्य-बाण

SCROLL FOR NEXT