Mrumayee Kadam  esakal
मनोरंजन

Mrumayee Kadam : सावळी म्हणणाऱ्यांना भाऊ कदमच्या मुलीनं दिलं सणसणीत उत्तर, 'तुम्हाला तर...'

आता मात्र भाऊच्या लाडक्या लेकीनं मृण्यमीनं तिला सावळी म्हणणाऱ्यांना परखड शब्दांत सुनावले आहे.

युगंधर ताजणे

Bhau Kadam Daughter Mrumayee Comment Color Tone : टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीनं प्रेक्षकांना मनमुराद हसवणाऱ्या आणि त्यांचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या भाऊ कदमची क्रेझ काही वेगळीच आहे. त्याचं बोलणं, विनोदाचं टायमिंग आणि सादरीकरण यामुळे प्रेक्षक हे नेहमीच भाऊचं कौतूक करत आले आहे. मात्र आता भाऊची लेक मृण्मयी देखील एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

फु बाई फू, चला हवा येऊ द्या हे विनोदी कार्यक्रम माहिती नाही असे म्हणणारा मराठी माणूस सापडणं निराळं. या कार्यक्रमांमधूनच भाऊ सारखा एक वेगळा चेहरा समोर आला. आणि त्यानं बघता बघता आपल्या नावाची वेगळीच ओळख मराठी मनात तयार केली आहे. आजच्या घडीला भाऊ हा मराठी मनोरंजन विश्वातील मोठा सेलिब्रेटी झाला आहे. भाऊ हा जसा त्याच्या विनोदी स्वभावाबद्दल प्रसिद्ध आहे तसाच तो परखड बोलण्यासाठी ओळखला जातो.

Also Read -Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे

यापूर्वी भाऊनं त्याला सोशल मीडियावर ज्या वेगवेगळया कारणांसाठी ट्रोल केले जाते त्यावरुन नेटकऱ्यांना खडसावले होते. आता मात्र त्याच्या लाडक्या लेकीनं मृण्यमी कदमनं तिला सावळी म्हणणाऱ्यांना परखड शब्दांत सुनावले आहे. १८ वर्षांच्या मृण्मयीचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात कमेंटस देखील मिळाल्या आहेत. मृण्मयीनं स्वताचे एक युट्यूब चॅनेल सुरु केले आहे.

मृण्मयीनं जी मुलाखत दिलं आहे त्यात तिनं चेहऱ्याच्या रंगावरुन प्रतिक्रिया दिली आहे. ‘लोकमत सखी’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिनं याविषयी सांगितलं आहे. ती म्हणते, आमच्या घरातील सगळ्याच माणसांचा रंग हा सावळा आहे. फक्त आई गोरी आहे. पण मला लहानपणापासून कुणी कधीही त्यावरुन बोललं नाही. हिणवलंही नाही.

मी जेव्हा माझं युट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा मला त्वचेच्या रंगाची कधीच भीती वाटली नाही. माझा स्किन टोन काय आहे याचा विचार मी कधी केलाच नाही.

मी रंगाचा विचार न करता माझे काम करत गेले. ते व्हिडिओ सोशल मीडियावर शेयरही केले. त्याला मिळालेला प्रतिसादही प्रचंड होता. यासगळ्यात आवर्जून सांगायची बाब म्हणजे मृण्मयीला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या हजारात आहे. तिला फॉलोअर्स मोठा आहे. तिच्या प्रत्येक व्हिडिओला मिळणाऱ्या कमेंटसही भन्नाट आहेत. तुम्ही मला कमेंट करताना सावळी म्हणता हेच गोऱ्या मुलींना कधी काय म्हणता का, असा प्रश्न तिनं नेटकऱ्यांना केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT