Bheed Box Office Collection day 3 cast rajkummar rao bhumi pednekar movie sakal
मनोरंजन

Bheed Box Office Collection: प्रेक्षकांची 'भीड' जमेना! राजकुमार रावचा सिनेमा फ्लॉप.. पाहा कमाईचे आकडे..

करोनाचा विषय मांडला पण प्रेक्षकांच्या पचनी पडला नाही.

नीलेश अडसूळ

Bheed Box Office Collection : गेली काही दिवस भीड या चित्रपटाची बरीच चर्चा होती. करोनाकाळावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात राजकुमार राव, भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत आहेत तर अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

अनुभव सिन्हा यांनी कायमच बॉलीवुडला वेगळे विषय आणि दमदार चित्रपट दिले आहेत. त्यामुळे या चित्रपटकाडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. हा चित्रपट हिट ठरेल असेही बोलले जात होते. पण तसे बॉक्स ऑफिसवर मात्र दिसले नाही.

सध्या बॉलीवुडमध्ये सुरू असलेला 'करोना'वर चित्रपट करण्याचा ट्रेंड इथे सपशेल फसलेला दिसतो. कारण हा चित्रपट आता फ्लॉप ठरताना दिसत आहे.

(Bheed Box Office Collection day 3 cast rajkummar rao bhumi pednekar movie)

भीड हा चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत. पहिल्या दिवशी या चित्रपटानं अगदीच कमाई केली. अवघा १५ लाख रुपयांचा या चित्रपटाने केला. वीकएंडला हा चित्रपट चालेल असेही काहींचे म्हणणे होते. पण तसे झाले नाही.

तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 26 मार्च रोजी 'भीड' या चित्रपटानं  केवळ ७० लाखांचे कलेक्शन केले . त्यामुळे तीन दिवसात एकूण या चित्रपटाने 1.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

या चित्रपटात राजकुमार राव, भूमी पेडणेकर  यांच्यासोबतच कज कपूर, आशुतोष राणा, दिया मिर्झा, संजय मिश्रा, कृतिका कामरा या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं समीक्षकांनीही कौतुक केलं पण प्रेक्षकांना मात्र हा चित्रपट आवडलेला दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT