Akanksha Dubey, Akanksha Dubey news, Akanksha Dubey suicide, Akanksha Dubey last video SAKAL
मनोरंजन

Akanksha Dubey Suicide: आत्महत्या करण्याआधी समोर आला आकांक्षा दुबेचा शेवटचा व्हिडिओ

अशातच आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Akanksha Dubey Suicide News: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने बनारसमधील सारनाथ येथील हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. आकांक्षाच्या आत्महत्येची खबर येताच सगळीकडे खळबळ माजली आहे.

वयाच्या २५ व्या वर्षी आकांक्षाने हे टोकाचे पाऊल उचलले. आकांक्षाच्या सारनाथ पोलीस स्टेशन सोमेंद्र हॉटेलमध्ये आकांक्षाने गळफास घेतला.

आकांक्षाने आत्महत्या केल्याची खबर हि भोजपुरी इंडस्ट्रीसाठी अत्यंत धक्कदायक आहे. अशातच आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

(bhojpuri actress Akanksha Dubey last video viral before she committing suicide)

हेही वाचा: नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

या व्हिडिओत आकांक्षा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत असून तिने जीन्स परिधान केलीय.आकांक्षा सेल्फी कॅमरा हातात ठेवुन आरशासमोर भोजपुरी गाण्यावर डान्स केलाय. आकांक्षा आनंदात ठुमके लगावताना दिसतेय.

आकांक्षाचा व्हिडिओ अगदी काही तासांपूर्वीचा आहे. हा व्हिडिओ पाहून आकांक्षा गळफास घेऊन करून स्वतःचं आयुष्य संपवेल याची कोणी कल्पना करू शकत नाही.

आकांक्षाच्या या व्हिडिओखाली तिच्या फॅन्सने तिला श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केलाय. याशिवाय आत्महत्येनंतर काही तासांनी अभिनेत्रीचे शेवटचे गाणे रिलीज करण्यात आले. 'ये आरा कभी हरा नहीं' असे या गाण्याचे शीर्षक आहे.

या गाण्याचा व्हिडिओ पवन सिंग आणि आकांक्षा यांच्यावर शूट करण्यात आला आहे. गाण्याचे बोल जावेद अख्तर आणि इमामुद्दीन यांचे असून संगीत प्रियांशू सिंग यांनी दिले आहे.

या गाण्याच्या व्हिडिओला अवघ्या 5 तासात 4 लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. येथे व्हिडिओ पहा. आकांक्षाच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस सखोल तपास करत आहेत.

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने रविवारी सारनाथमधील हॉटेलमध्ये आत्महत्या केली. बॉलिवूड रिपोर्टनिसार, आकांक्षा चित्रपटाच्या शूटिंगसाठी वाराणसीला गेली होती. मात्र रविवारी ती तिच्या रुममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळली.

आकांक्षाने अभिनेत्रीने याआधी अनेक मोठ्या भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आकांक्षानं 'मुझसे शादी करोगी', 'साजन' अशा भोजपूरी सिनेमांमध्ये काम केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Deepfake Rules : बनावट व्हिडिओ अन् बातम्या पसरवाल तर थेट तुरुंगात जाल! संसदेत AI डीपफेक कायद्यावर मोठा निर्णय, नक्की वाचा

पाकिस्तानचे प्रेक्षकही पलटले! संघ हरतोय दिसताच हिरव्या जर्सीवर चढवली टीम इंडियाची जर्सी; Viral Video

Supreme Court : वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'या' तरतुदींना दिली स्थगिती, संपूर्ण कायदा रद्द करणार?

Mumbai Rain: मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट! पुढील ३ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

...अन् आईचे अश्रू बदलले आनंदाश्रूत, नऊ महिन्यांच्या बाळाने गिळलेली सेफ्टी पिन डॉक्टरांनी काढली बाहेर

SCROLL FOR NEXT