Bhumi Pednekar latest news esakal
मनोरंजन

Bhumi Pednekar : काय सांगता भूमी हॉलीवूडला चालली, 'भक्षक' नंतर मिळणार मोठी संधी?

भूमीच्या भक्षक (Bhumi Pednekar Bhakshak Movie) नावाच्या चित्रपटानं तिला वेगळी ओळख मिळवून दिली आहे.

युगंधर ताजणे

Bhumi Pednekar : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकर ही सध्या चर्चेत आली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे तिचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला भक्षक नावाचा चित्रपट. त्यात तिनं एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे. भूमीच्या त्या भूमिकेचे जोरदार कौतुक होत आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी काळात भूमीच्या वाट्याला मोठी संधी येणार असल्याची चर्चा आहे. ती बॉलीवूडमधून थेट हॉलीवूडला जाणार असल्याचे बोलले जात आहे. भूमीचा बॉलीवूडबरोबरच हॉलीवूडच्या प्रवासाला लवकरच होणार सुरुवात अशा चर्चांना आता उधाण आले आहे. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या भूमीच्या भक्षक या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

भूमीनं भक्षकमध्ये जी भूमिका केली आहे त्याचे सगळीकडे कौतुकहोत आहे. या चित्रपटातील भूमीच्या चमकदार अभिनयामुळे तिची प्रशंसा होतेय. जागतिक कंटेंट प्लॅटफॉर्मवर भारताला अभिमान वाटावा असा आणखी एक मैलाचा दगड भक्षक ने पार केला आहे. सध्या ट्रेंडिंग चित्रपटामध्ये भूमीच्या भक्षकचे नाव घेतले जात आहे.

कारकिर्दीचा हा मोठा टप्पा आणि आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी पाहता, भूमी हॉलिवूडमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ती आता हॉलीवूडच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत तिच्याशी काही निर्मात्यांनी संपर्कही साधल्याची माहिती आहे. त्यानिमित्तानं ती मार्च किंवा एप्रिलमध्ये लॉस एंजेलिसमध्ये मीटिंगसाठी जाऊ शकते. अशीही माहिती आहे.

एक ट्रेड सूत्राने माहिती दिलेल्या माहितीनुसार, “भूमी जवळपास 9 वर्षांपासून तिच्या अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. तिच्या बहुतेक चित्रपटांनी तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT