Bhumi Pednekar Bhakshak Movie esakal
मनोरंजन

Bhumi Pednekar Bhakshak Movie : '14 वर्षांची होते, तेव्हा माझ्यासोबत...,'भक्षक'च्या निमित्तानं सांगितला 'तो' भयाण अनुभव!

भूमीनं (Bhumi Pednekar) तिच्या भक्षक (Bhakshak Movie Latest News) चित्रपटाच्या निमित्तानं सांगितलेला तो अनुभव भयानक होता.

युगंधर ताजणे

Bhumi Pednekar Bhakshak Movie : भूमीनं भल्याही तिच्या काही चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका केल्या असतील मात्र तिच्या त्या भूमिकांमध्ये (Bhumi Pednekar Latest News) वेगळेपण होते हे तिचे चाहते आणि नेटकरीही मान्य करतील. भूमीचा थँक यू फॉर कमिंग नावाच्या (Thank U For Comming) चित्रपटातील भूमिकेचं जेवढं कौतुक झालं तेवढीच त्यावर टीकाही झाल्याचे दिसून आले.

येत्या काही दिवसांत भूमीचा भक्षक नावाचा चित्रपट येतो आहे त्यात ती एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. अल्पवयीन मुलींवर होणारे (Bhakshak Movie Latest News) अन्याय आणि अत्याचार यामुळे त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. त्याच्या व्हायरल झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

भक्षकमध्ये भूमीसोबत मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरही (Sai Tamhankar) दिसणार आहे. तिनं या चित्रपटामध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. सध्या वेगवेगळ्या प्रकारे भक्षकचे प्रमोशन सुरु आहे. त्यात एका प्रमोशन इव्हेंटमध्ये भूमीनं तिला वयाच्या १४ व्या वर्षी त्या अनुभवाला सामोरं जावं लागल्याचे सांगितले. आपण कुटूंबासमवेत असून देखील गर्दीतला तो अनुभव घेतला आणि मोठा धक्काच बसला. असे भूमीनं म्हटलं आहे.

मी काहीच बोलू शकत नव्हते आणि कुणाला सांगू शकत नव्हते. मात्र त्या गोष्टीचा माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला होता. तो प्रसंग घडला तेव्हा मी अवघ्या १४ वर्षांची होते. आम्ही कुटूंबातील सगळेजण बांद्र्याला भरलेल्या एका यात्रेत गेलो होतो. त्याचवेळी तो प्रसंग घडला. कुणीतरी मला वाईटपद्धतीनं स्पर्श करुन गेलं होतं. मी पटकन मागे वळून पाहिले मला काही समजलेच नाही.

आम्ही जिकडे गेलो होतो तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. हात सुटल्यास चुकण्याची भीती होती. अशा परिस्थिती माझ्यासोबत जे घडलं ते खूपच भयानक होतं. पुढील कित्येक दिवस तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरुन जात नव्हता. पुढे सोसायटीतील माझ्या सोबतच्या मित्रांसोबतही मी बोलू शकत नव्हते एवढा मला त्या गोष्टीचा धक्का बसला होता. अशी आठवण भूमीनं यावेळी सांगितली.

भूमीच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तिचा भक्षक नावाचा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवरुन प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये सई ताम्हणकर, आदित्य श्रीवास्तव आणि संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT