मनोरंजन

जितेंद्र शिंदेची बदली, अमिताभ वर्षाला बॉडीगार्डला १.५ कोटी द्यायचे का?

अमिताभ यांचा बॉडीगार्ड राहिलेल्या जितेंद्र शिंदेच्या बदलीची इतकी चर्चा का आहे?

सुरज सावंत

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याकडे २०१५ पासून सुरक्षा रक्षक (security guard) म्हणून कामाला असलेल्या जितेंद्र शिंदेची (Jitendra Shinde) डीबी मार्ग पोलिस ठाण्यात (db marg police station) बदली करण्यात आली आहे. शिंदेला अमिताभ बच्चन यांच्याकडून अंदाजे दीड कोटी वार्षिक मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलिस आयुक्तांनी ५ वर्षाहून अधिक काळ एकाच ठिकाणी सेवा बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले होते.

त्यानुसार जितेंद्र शिंदेची आता डी.बी.मार्ग पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. दरम्यान जितेंद्रच्या पत्नीच्या नावे एक सिक्युरिटी एजन्सी असल्याचा आरोप असून त्यात जितेंद्र पैसे गुंतवत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

बिग बी अमिताभ बच्चन यांचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. अमिताभ बाहेर पडल्यानंतर नेहमीच चाहत्यांचा त्यांच्याभोवती गराडा असतो. अमिताभ यांचे बंगल्याबाहेर पाऊल पडताच जितेंद्र शिंदे सक्रीय होतो. बहुतांश फोटोंमध्ये अमिताभ यांच्यासोबत हा माणूस दिसतो. बिग बीं बरोबर सावली सारख्या वावरणाऱ्या जितेंद्र शिंदेंबद्दल जाणून घेऊया.

जितेंद्र शिंदे हा अमिताभ यांचा पर्सनल बॉडीगार्ड आहे. भारतात आणि देशाबाहेर अमिताभ यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्याच्यावर होती. फिल्म शूटिंगपासून ते केबीसीच्या सेटपर्यंत जितेंद्र सावलीसारखा अमिताभ यांच्यासोबत वावरत असतो. जितेंद्र शिंदेची स्वत:ची सुरक्षा एजन्सी असल्याची चर्चा आहे. पण तो स्वत: अमिताभ यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतो. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार अमिताभ त्याला वार्षिक दीड कोटी रुपये पगार देतात. देशातील अनेक खासगी कंपन्यांच्या CEO पेक्षा त्याचा पगार जास्त आहे. अमेरिकन अभिनेता आणि निर्माता एलीजाह वूड याला त्याच्या भारत दौऱ्या दरम्यान जितेंद्र शिंदेनेच सुरक्षा पुरवली होती. बिग बी यांनीच शिंदेला वूड यांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यास सांगितले होते. डीएनएने आपल्या वृत्तात हे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार प्रत्येकी ३००० रुपये; निधी मागणीची फाईल वित्त विभागाकडे; बालसंगोपन योजनेसाठीही मिळणार १०० कोटी

पोलिस ठाण्यात जाऊनही न्याय मिळत नाही, चिंता नको, आता प्रत्येक शनिवारी भेटणार ‘एसपी’! सोलापूर पोलिसांचे ‘न्याय संवाद’ ॲप, ‘या’ क्रमांकावर करा तक्रार

HSC Hall Ticket 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! आजपासून बारावीचे हॉल तिकीट उपलब्ध; असे करा डाउनलोड

प्रचार उद्या थांबणार! मंगळवारी रात्रीपासून उमेदवारांच्या हालचालींवर राहणार नजर; रात्री १० नंतर सोलापूर शहरातील पक्ष कार्यालये, दुकाने राहणार बंद, वाचा...

e-SIM Fraud Awareness : ई-सिम कार्डच्या नावावर फसवणूक

SCROLL FOR NEXT