Big Boss 13 deepika visited house and took contestants outside  
मनोरंजन

Big Boss 13 : घरामध्ये आलेली दीपिका 'या' सदस्यांना घेऊन गेली फिरायला

वृत्तसंस्था

मुंबई : 'बिग बॉस' 13 सीजनला मोठा प्रतिसाद मिळत आहे. बिगबॉस आणि सलमान खान हे समीकरण म्हणजे फुल एन्टेंरटेन्टमेंट. प्रेक्षकांना बिगबॉसचा होस्ट म्हणून सलमान खान यालाच पाहायला आवडते. सलमानने जवळपास 10 सिझन बिगबॉस होस्ट केले आहे. बिग बॉसच्या घरात कधी काय होईल हे सांगता येणार नाही. घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने ड्रामा हा होतच असतो. पण, या सिझनमध्ये याआधी न झालेल्या गोष्टी घडत आहेत. 'छपाक' च्या प्रमोशनसाठी दीपिका बिग बॉसच्या घरात पोहोचली होती. पण, घरामध्ये येऊन ती काही सदस्यांना चक्क घराबाहेर घेऊन गेली आहे. बघा नक्की काय आहे यामागचं कारण.

बिग बॉसच्या घरामध्ये टिकून राहणं तितकही सोप्पं नाही. बिग बॉस सदस्यांना काही टास्क देतात आणि त्यामधून जिंकून तुम्हाला सेफ व्हावं लागतं. आजच्या एपिसोडमध्येही असाच एक मजेशीर टास्क सदस्यांना मिळणार आहे. या टास्कमध्ये घरातील सदस्यांना एकमेकांवर विनोद करायचे आहेत. या टास्कसाठी सदस्यांचे दोन गट पाडण्यात येतात. प्रमोशनसाठी आलेली दीपिका मात्र या गेममध्ये चांगलाच ट्विस्ट आणते. 

जिंकलेल्या सदस्यांना दीपिका घराबाहेर घेऊन जाते. एवढचं नाही तर या सदस्यांना ती जिपमधून फिरवतेही. या एपिसोडचा प्रोमो कलर्स टीव्हीच्या इन्स्टाग्राम पेजने शेअर केला आहे. तर, फोटोजर्नलिस्ट मानव मंगलानीने यावेळचे काही फोटोही अपलोड केले आहेत.  या फोटोमध्ये दिसत आहे ती दीपिकासोबत जिपमध्ये कंटेस्टेंट्स विशाल आदित्य सिंह, शहनाज गिल, शेफाली जरीवाला, आराती सिंह आणि मधुरिमा तुली दिसत आहेत. 

विशाल जिप चालवताना दिसतो आहे. बिग बॉसच्या घरामध्ये हे पहिल्यांदाच घडणार आहे की, घरातील सदस्यांना सुरु असलेल्या शोमधून बाहेर नेण्यात येत आहे. बिग बॉसच्या घराचा हाच नियम आहे की, घर न सोडता तुम्हाला त्यामध्ये टिकून राहावं लागतं. एकदा घर सोडलं की तुम्ही शोमधून बाहेर पडता. पण, दीपिकासोबत हे सदस्य का बाहेर गेले आहेत हे आजच्या एपिसोड़मधूनच लक्षात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT