Mahira got extreme angry on vikas comment on her lips
Mahira got extreme angry on vikas comment on her lips  
मनोरंजन

Big boss 13 : 'माहिरा मोठ्या ओठांची पाल' विकासच्या कमेंटवर माहिराचा संताप !

वृत्तसंस्था

मुंबई : बिग बॉसच्या घरात कधी काय होईल हे सांगता येणार नाही. घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने ड्रामा हा होतच असतो. त्यातच आता घरामध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे आणि या ड्रामामध्ये अधिकच भर पडली आहे. वादाला नवे तोंड फुटले आहे आणि शोमध्ये नवीव ट्विस्टही आला आहे. वाइल्ड कार्डने घरामध्ये गेलेल्या 'हिंदूस्तानी भाऊ' ची चर्चा सर्वत्र पाहायला मिळतेय. हिंदूस्तानी भाऊ म्हणजेच विकास पाठकने माहिरावर कमेंट केली आहे ज्यामुळे ती प्रचंड रागात आहे. जाणून घ्या विकास नक्की माहिराला बोलला तरी काय ?

घरातल्या नव्या सदस्याला म्हणजे विकासला बिग बॉसकडून एक मजेशीर टास्क मिळते. या टास्कमधून घरातील कोणत्याही तीन सद्स्यांवर त्याला व्हिडीओ बनवत त्यांच्यावर बोलण्यास सांगितले होते. जेलमध्ये असलेली माहिरा भाऊला अनेकदा विचारते आणि तिच्यावरच कमेंट करण्यासाठीदेखील सांगते. विकास जेलमध्ये असलेल्या माहिराची सतत थट्टा करत असतो. दरम्यान विकास तिला 'मोठ्या ओठांची पाल' असं चिडवतो.

या कमेंटनंतर मात्र माहिरा चांगलीच भडकते. भाऊच्या या कमेंटवर घरातील इतर सदस्यही खूप हसतात. तिच्यासोबत जेलमध्ये असलेल्या पारसवर ती सर्व राग काढताना दिसते. याच रागामध्ये पारस आणि माहिराचे जबरदस्त भांडण होते. पारस माहिराला समजवण्याचादेखील प्रयत्न करतो. 

भाऊच्या कमेंटवर माहिराची आई नाराज
स्पॉटबॉय या साइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये घड़लेल्या प्रकारावर माहिराच्या आईने मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या,' भाऊने माझ्या मुलीवर केलेल्या कमेंटमुळे मी विचलित आहे. जेव्हा तुम्ही नॅशनल टीव्ही शोमध्ये बोलत असता तेव्हा तुमच्या बोलण्याचं भान राखलं पाहिजे. मी प्रचंड निराश आहे कारण, विकासने माझ्या मुलीवर अशाप्रकारे कमेंट केली आहे. 

पुढे त्या म्हणाल्या, 'विकासने जेव्हा घरामध्ये एन्ट्री केली तेव्हा मी खूप आनंदी होते, त्याने माझ्या मुलीला छोट्या बहिणीची उपमा दिली. पण, आताच्या त्याच्या वागण्याचा मला जाब विचारायचा आहे. कोणता भाऊ अशाप्रकारे बहिणीवर कमेंट करतो ?' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT