bigg bosbigg boss 14 Ejaz khan met Pavitra punia brother Ejaz khan wants to marry pavitra punias 14 eijaz khan met pavitra punia brother eijaz khan wants to marry pavitra punia 
मनोरंजन

'पवित्राला मागणी घालण्यासाठी गेला एजाज'; तिच्या भावाला सांगितले...

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  बिग बॉसच्या घरातून एजाज खान त्य़ाच्या वैयक्तिक कारणास्तव बाहेर पडला. त्यानंतर बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांनी खंत व्यक्त केली. काहींनी आनंद व्यक्त केला मात्र तो न दाखवता. रागीट स्वभावाच्या एजाजनं अनेकांशी पंगा घेतल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्याला दोन तीन सहकारी वगळता इतर कुणी सहकार्य करत नव्हते. एजाजच्या आणि पवित्राच्या प्रेमाची गोष्ट कुणापासून लपवून राहिलेली नाही. त्य़ांनी सोशल मीडियावर आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

एजाज आणि पवित्राच्या प्रेमाची गोष्ट सर्वांचे लक्ष वेधून घेणारी होती. त्यानं अनेकदा तिला प्रपोझ केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. मात्र आपण काही केल्या पवित्राची साथ सोडणार नाही असे म्हणत त्यानं तिला प्रपोझ केलं होतं. आता एजाजला ही गोष्ट पुढे न्यायची आहे. त्यासाठी त्यानं पवित्राला थेट लग्नासाठी विचारणा केली आहे. एजाजनं यापूर्वी आपल्याला स्वप्नातली राजकुमारी भेटली आहे असे सांगितले होते. अनेकांनी त्यांच्यावर अशी टीका केली होती की केवळ या शो मध्ये टिकून राहायचे म्हणून त्यांनी प्रेमाचे नाटक केले आहे. यावर एजाजनं टीका करणा-यांना फटकारले होते. तो म्हणाला, लोकं काय म्हणतात याचे मला काहीही घेणे नाही. आपल्याला जे आवडते ते इतरांना आवडायला हवे असा काही अट्टाहास नाही. त्यामुळे आपण काहीही केलं तरी प्रत्येकवेळी लोकांच्या नजरेत चांगले राहू हे सांगता येणार नाही.

आता एजाज बिग बॉसच्या घराबाहेर गेला आहे. मात्र त्यानं पवित्राला मागणी घालण्याचा निर्धार केला असल्यानं तो तिच्या घरी गेला. यावरुन त्या नात्यावरुन किती गंभीरपणे विचार करतो आहे याची कल्पना येईल. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखती दरम्यान एजाजने सांगितले की, मला पुनिया फार आवडते. आम्हाला एकमेकांबद्दल आदर आहे. आणि मला तिच्या सोबत लग्न करायचे आहे. बराच काळ आम्ही एकमेकांसोबत घालवला आहे. आमच्या दोन्ही परिवारांना आम्ही समजावले आहे. त्यासाठी थोडा विरोध झाला.

एजाजनं सांगितले की, आम्हाला कुठलीही घाई नाही. मी बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर तिच्या घरच्यांना भेटायला गेलो. त्यावेळी तिच्या भावाला भेटलो. मी त्याला सांगितले की, मी एक चांगला माणूस आहे. माझा दुसरा कुठलाही हेतू नाही. मला तुम्हा सगळ्यांना भेटायचे आहे.  कारण आपल्या दोन्ही परिवारांध्ये काही गैरसमज आहेत. मी आता सगळ्यांना सांगितले आहे की पवित्रावर माझे खूप प्रेम आहे. आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही परिवाराची भेट घेतल्य़ानंतर मी अर्धी लढाई जिंकली आहे. याशिवाय आणखी मला काही करायचे नाही.  
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT