Big Boss 16: Mc Stan fans warns gautam over unnecessary fight call him sasta hrithik roshan  Goolge
मनोरंजन

Big Boss 16: 'हा तर गरिबांचा हृतिक..',गौतमला सुनावताना रॅपरच्या भडकलेल्या चाहत्यांची घसरली जीभ

'बिग बॉस १६' सुरु होऊन तीनच दिवस झालेयत तोवर राड्यांनी धुडगूस घातलाय घरात.

प्रणाली मोरे

Big Boss 16: बिग बॉस १६ सुरु होऊन तीनच दिवस सरलेयत तोवर राड्यांनी धुडगूस घातलाय घरात. स्पर्धकांच्या अॅटिट्युडची सोशल मीडियावर शाळा घेतली जातेय. सध्या सोशल मीडियावर सगळ्यात ट्रेन्डिंगला आहेत बिग बॉस १६ मधील राडे. अर्चना-निम्रत यांच्यातील भांडणानंतर आता गौतम विग रॅपर एमसी स्टेनला भिडलेला दिसला. गौतम विगनं रॅपर एमसी स्टेना 'आपली ड्युटी कर' असं म्हटलं आणि रॅपरने देखील मस्करीत 'हा करीन नंतर' असं म्हटल्यानं सगळं वातावरणं पुढे तंग झालं. गौतम रॅपरच्या या मस्करीतल्या अंदाजानं भडकला आणि मग सुरु झालं दोघांमधील द्वंद्व.

अर्थात गौतमनं कारण नसताना भांडण उकरुन काढलं म्हणून घरातल्यांनी देखील त्याला सुनावलं आणि स्टॅनला पाठिंबा दिला. अर्थात त्यानंतर घरातल्यांनी त्यांच्यातील वाद मिटवला आणि मग त्या दोघांनीही भांडण मिटवत एकमेकांची गळाभेट घेतली. पण घरात सगळं वातावरण निवळलं असलं तरी रॅपरच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मात्र वाद छेडला आहे. रॅपरचा गौतमनं केलेला अपमान त्यांना सहन नाही झालाय.

बिग बॉस १६ मध्ये स्पर्धकांनी आपली ड्रामेबाजी सुरु केली आहे. सुरुवातीलाच काही स्पर्धकांमध्ये भांडणं झाली सुद्धा. बिग बॉसमधील अगदी लेटेस्ट भांडणाविषयी बोलायचं झालं तर एमसी स्टेन आणि गौतम विगचं नाव समोर येत आहे. सोशल मीडियावर एससी स्टेनचं नाव ट्रेंडिग लिस्टमध्ये आहे.

गौतम सोबत झालेल्या स्टेनच्या भांडणानंतर, आता रॅपरचे चाहते गौतमला खूप खरीखोटी ऐकवताना दिसत आहेत. एवढंच नाही तर रॅपरसोबत आगाऊपणाची गौतमनं भाषा केल्यानं थेट त्याला धमकी देखील दिली जातेय. रॅपरच्या एका चाहत्यानं लिहिलं आहे,'गरीबांच्या या हृतिक रोशनला काही गरज होती का भांडायची,नावानं हाक मारायची एमसी स्टेन,नावच काफी आहे'. दुसऱ्या एकानं लिहिलं आहे,'एमसी स्टेनसोबत पंगा घेतलास तर अंगावर कपडे ठेवणार नाही तुझ्या गौतम विग'.

बिग बॉस शो च्या या सिझनमधील काही स्पर्धक सोशल मीडियावर भलतेच ट्रेन्डिंगला आहेत. त्यांच्यापैकी एक नाव आहे एमसी स्टेन. त्याचं सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलॉइंग आहे. आतापर्यंत बिग बॉसमधला सर्वात शांत स्पर्धक म्हणून लोकांच्या समोर आलेला रॅपर एमसी स्टेन प्रेक्षकांचं कसं मनोरंजन करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सोशल मीडियावर एमसी स्टेन आणि गौतम यांचेच भांडण नाही तर साजिद-शालिनचं भांडणही चर्चेत आलं आहे. बिग बॉस १६ च्या नवीन प्रोमोत नॉमिनेशनच्या मुद्द्यावरनं दोघं आपसात भिडताना दिसले. साजिद शालीनच्या दुटप्पीपणावर प्रश्न निर्माण करत विचारताना दिसतोय की, 'एकीकडे तो त्याला भाऊ म्हणतो आणि दुसरीकडे त्याला नॉमिनेट करतो,हे काय आहे?', या साजिदच्या प्रश्नावर शालीन म्हणतो की,'तो तिथे गेम खेळायला आलाय'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation GR : सरकारने मनोज जरांगेना दिलेल्या 'जीआर'मध्ये काय? वाचा संपूर्ण अध्यादेश जसाचा तसा

Latest Marathi News Updates: सरकाकडून जीआर आल्यानंतरच जरांगे मुंबई सोडणार

Rohit Sharma खूपच बदलला, तब्बल २० किलो वजन केलं कमी; Photo पाहून चाहत्यांनीही केलंय कौतुक

Top Government Jobs September: सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारी भरती; आजच करा अर्ज, पहा टॉप १० सरकारी नोकऱ्यांची संपूर्ण यादी

Maratha Reservation : आमची उपासमार केली, पण आज ताजसमोर आम्ही जेवणावळी घालतोय! ताज हॉटेल समोरील रस्त्यावर जेवण वाटपासाठी गाड्यांची रांग

SCROLL FOR NEXT