Rakhi Sawant
Rakhi Sawant 
मनोरंजन

'हिला राणीच्या बागेत सोडा!'; राखीचा अजब लूक, नेटकरी वैतागले

सकाळ डिजिटल टीम

Entertainment News: बिग बॉसच्या गेल्या सीझनमध्ये बॉलीवूडची (Bollywood News) प्रसिद्ध सेलिब्रेटी राखी सावंतनं कमाल केली होती. त्यामुळे ती चर्चेत आली होती. यंदाच्या सीझनमध्ये देखील राखीनं पती (Rakhi Sawant) समवेत इंट्री केली होती. अनेकांना त्या गोष्टीचे आश्चर्य वाटले होते. त्या शो चा होस्ट सलमान खाननं देखील राखीला त्यावरुन छेडले होते. हा तुझा खरच पती आहे की, त्याला कुठून घेऊन आली असा प्रश्न राखीला सलमाननं विचारला होता. मात्र सलमानचे (salman khan) शब्द खरे ठरले आहे. केवळ त्या शो पुरतेच राखीनं रितेशशी लग्न केलं होतं. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचाही घटस्फोट झाला आहे. नेहमीप्रमाणे राखीनं त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोपही केले आहेत. सध्या राखी तिच्या वेगळ्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

राखीचा सोशल मीडियावर जो लूक व्हायरल झाला आहे त्याला नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स मिळाल्या आहेत. त्याचं झालं असं की, राखी तिच्या मित्रांसोबत गंगुबाई काठियावाडीचा प्रिमिअर पाहण्यासाठी गेली होती. त्यावेळी उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सनं तिचे फोटो घेतले. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोंना नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत. एकानं लिहिलं आहे की, हॉलीवूडची नक्कल कऱणारी ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण, आणखी एकानं लिहिलं आहे की, या सेलिब्रेटीला राणीच्या बागेत पाठवा. नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांनी लक्ष वेधलं गेलं आहे.

राखीनं गंगुबाईच्या प्रिमिअरला रेड कलरचा एक वन पीस परिधान केला होता. त्यामध्ये ती अजबच दिसत होती. त्या लूकची सोशल मीडियावर चर्चा आहे. राखी सावंतचा तो लूक विरल भयानीच्या इंस्टावर व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. राखी सावंतच्या काही मित्रांनी यावेळी एक गंगुबाई वेगळ्याच अवतारात दिसून आल्याचे म्हटले आहे. बॉलीवूड आणि हॉलीवूड अशा मिक्स प्रकारची पर्सनॅलिटी यानिमित्तानं दिसून आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राखीनं कंगनाला सुनावलं होतं. कंगनाचा नवीन शो आता सुरु होणार आहे. त्यावरुन तिनं जे वक्तव्य केलं होतं त्यावर राखीनं नाराजी व्यक्त केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT