bigg boss 15 winner Tejasswi prakash first look in man kasturi re marathi movie sakal
मनोरंजन

क्यूट दिसतेस! 'मन कस्तूरी रे' चित्रपटातील तेजस्वी प्रकाशच्या फस्ट लुकवर चाहते फिदा

'बिग बॉस १५'ची विजेती तेजस्वी प्रकाश मराठी चित्रपटात झळकणार असून तिचा फस्ट लुक रिलीज झाला आहे.

नीलेश अडसूळ

tejasswi prakash: बिग बॉस 15 ची विजेती आणि नागिन 6 ची हिट अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सातत्याने चर्चेत असते. मग त्या चर्चा तिच्या कामाबद्दल असो किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल. ती नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेत असते. तेजस्वी तिच्या अप्रतिम सौंदर्यासाठी आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. छोट्या पडद्यावरुन आपल्या भेटीला येणारी तेजस्वी लवकरच मराठी रुपेरी पडदयावर आपला जलवा दाखवणार आहे. ती 'मन कस्तूरी रे' या मराठी चित्रपटातून चित्रपटविश्वात पदार्पण करणार आहे. नुकताच तिचा 'फस्ट लुक' रिलीज झाला आहे. (bigg boss 15 winner Tejasswi prakash first look in man kasturi re marathi movie)

हा लुक पाहुन चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत. काहीशी गोड काहीशी रॉकिंग अशा 'श्रुती'चे पात्र ती साकारत आहे. नितीन केणी यांच्या ‘मुंबई मुव्ही स्टुडिओ’ची प्रस्तुती असलेला हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. (Tejasswi Prakash Debut In Marathi Movie with Abhinay Berde)

या चित्रपटात तेजस्वी सोबत अभिनेता अभिनय बेर्डे झळकणार आहे. या दोघांची ‘लव्हेबल केमिस्ट्री’ आपल्या चाहत्यांची मने जिंकायला सज्ज झाली आहे. चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन संकेत माने यांचे आहे. इमेन्स डायमेन्शन एंटरटेन्मेंट आर्टस प्रोड्क्शन, वेंकट अत्तीली आणि मृत्युंजय किचंबरे यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे. निशिता केणी आणि करण कोंडे यांच्या ड्रगन वॉटर फिल्म्सने या चित्रपटाची सहनिर्मीती केली आहे. तर ‘यूएफओ सिने मिडिया नेटवर्क’ या चित्रपटाचे वितरक पार्टनर आहेत. व्यवसायप्रमुख शौमिल शहा आहेत.

तेजस्वी प्रकाशने आत्तापर्यंत संस्कार -धरोहर अपनों की, स्वरांगिनी- जोडे रिश्तों के सूर, पहरेदार पिया की, सिलसिला बदलते रिश्तों का, नागिन अशा हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तेजस्वीच्या चाहत्यांसाठी तिचा हा मराठी सिनेमा एक ट्रीट असेल. तेजस्वी सोबत या सिनेमात अभिनय बेर्डे आहे.ती सध्या काय करते, अशी ही आशीकी आणि रम्पाट नंतर अभिनयच्या नव्या रोमँटिक सिनेमाची त्याच्या फॅन्सना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT