shiv thakare and salman khan Sakal
मनोरंजन

Bigg Boss 16: शिव ठाकरेचं नशीब चमकलं, सलमान खानच्या चित्रपटात झळकणार

शिव ठाकरेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतातील सर्वात मोठा रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉसने अनेक स्पर्धकांचे नशीब उजळले आहे. शिव ठाकरेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिव बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

खरं तर, सध्या शिव ठाकरे बिग बॉस 16 मध्ये खूप चर्चेत आहेत. 'बिग बॉस 16'च्या नुकत्याच पार पडलेल्या एका भागात शिव ठाकरे आणि प्रियंका चाहर चौधरीने पती-पत्नी म्हणून एक नाटक केलं. या नाटकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आता शिव ठाकरेच्या संबंधित नवनवीन बातम्या समोर येत आहेत.

खरं तर, एका मीडिया रिपोर्टनुसार, शिव ठाकरेच्या हातात सलमान खानचा चित्रपट आहे. या चित्रपटात शिव ठाकरेही एका खास भूमिकेत दिसणार आहेत. मात्र अद्याप त्याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र शिव ठाकरेंच्या चाहत्यांसाठी ही बातमी चांगलीच आहे.

शिव ठाकरे व्यतिरिक्त, प्रियंका चाहर चौधरीबद्दल देखील अपडेट्स आले होते की प्रियंका देखील एका मोठ्या चित्रपटाचा भाग असेल. प्रियांका शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबतची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही.

भाईजानचा 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून अनेक स्टार्स बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. या चित्रपटात बिग बॉस 13 ची स्पर्धक शहनाज गिल दिसणार असून या चित्रपटातून तिचे बॉलिवूड डेब्यू होणार आहे.

याशिवाय सलमान खानचा पुढचा चित्रपट टायगर 3 देखील याच वर्षी रिलीज होणार आहे. अलीकडेच सलमान खान बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटात दिसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेलचा भडका, एसटीच्या तिकीट दराचे काय? परिवहन मंत्री म्हणाले, महामंडळाला तोटा होतोय, सध्या...

Ambenali Accident: आंबेनळी ठरतोय मृत्यूचा घाट, ८ वर्षांपूर्वी झालेला ३३ जणांचा मृत्यू; गेल्या तीन महिन्यात तिसरी दुर्घटना

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

SCROLL FOR NEXT