bichukle
bichukle 
मनोरंजन

बिगबॉस स्पर्धक अभिजीत बिचुकलेंना पोलिसांनी केली अटक

सकाळ वृत्तसेवा

सातारा : 'बिग बॉस मराठी' सीझन 2 मध्ये चर्चेत असलेला साताऱ्यातील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबई येथे बिग बॉसच्या घरातून ताब्यात घेतले आहे.

येथील न्यायालयात एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात बिचुकले याच्यावर खटला सुरू आहे. 2015 मध्ये हा खटला दाखल झाला होता. सद्या सहावे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आवटी यांच्या समोर हा खटला सुरु आहे. त्यात तो हजर राहत नसल्याने न्यायाधीश आवटी यांनी याप्रकरणी अटक वॉरंट काढले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तिघांचे पथक काल रात्री मुंबईला रवाना झाले होते. आज दुपारी त्यांनी बिचुकलेला बिग बॉसच्या घरातुन ताब्यात घेतले. त्याला साताऱ्यात आणले जात आहे. उद्या सकाळी त्याला न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT