Aarti Solanki Transformation: मराठी बिग बॉसमुळे लोकप्रिय झालेली आरती सोलंकी सध्या चर्चेत आली आहे. आरती सोलंकी मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री तर आहेच त्याचबरोबर तिने कॉमेडियन म्हणून ओळख मिळवली आहे. ती तिच्या बिनधास्त लाईफस्टाईलमुळे चर्चेचा विषय असते.
मात्र ती तिच्या वाढलेल्या वजनामुळेही चर्चेत आली होती. आता मात्र आरतीनं तिच्या तब्येतीवर लक्ष केद्रिंत करत फिट राहण्याकडे लक्ष दिले आहे. आरतीने स्वतःचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन झाले आहे. आरतीने 50 किलो वजन घटवलं आहे.
यापुर्वी आरतीचं वजन 132 किलो होतं. तिने तिच्यात झालेल्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे तिला ओळखणेही कठिण झाले आहे.
मात्र आरतीचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता. तिने आपल्या शरीरावर खुप मेहनत घेतली आहे. तिने योग्य डाएट नियमित व्यायाम करुन तिचे वजन कमी केले.
आरतीने राजश्री मराठी या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. यावेळी तिने याबद्दल सांगितले. याबद्दल बोलतांना आरतीने सांगितलं की तिचा वजन कमी करण्याचा प्रवास हा 2021 पासून सुरु झाला. त्यावेळी तिचं वजन तब्बल 132 किलो होते. त्यानंतर आरतीचे वजन 119 किलो झाले होते. मात्र नंतर काही कारणास्तव तिला तिची वेटलॉस जर्नीला थांबवावी लागली.
आरतीने नंतर एप्रिलपासून पुन्हा वजन कमी करायला सुरूवात केली. तेव्हा तिचे वजन 110 किलो होते. नियमित वर्कआऊट करणे, दररोज सात ते आठ तास चालणे आणि दिवसाला 40 हजार पावलं चालणे आणि योग्य डाएट करुन तिने वजन कमी केले. डाएटमध्ये ती सकाळी नाष्टा आणि दुपारी एक भाकरी किंवा चपातीी खाते.
त्यानंतर जर भुक लागली तर ती सॅण्डविच किंवा भेळ खाते आणि रात्री झोपताना दुध पिते असं तिने सांगितले. वजन कमी केल्यापासून खूप पॉझिटीव्हिटी आली आहे असं देखील आरतीनं सांगितलं.
तिच्या जवळची मंडळी तिचे खुप कौतुक करतात. आरतीला देखील स्वत:चे पुर्वीचे आणि आत्ताचे फोटो पाहिल्यावर खुप फरक जाणवतो. आरतीने यापुर्वी तिच्या वजनामुळे खुप टोमणे ऐकले, नकार पचवले मात्र आता तिला बदलायचं आहे असं आरती म्हणते .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.