Vishal Nikam Winner of Bigg Boss Marathi 3 
मनोरंजन

BBM 3: "गावातून आलेल्या या पोराला तुम्ही.."; विशाल निकमची पहिली प्रतिक्रिया

विशाल निकमने पटकावलं विजेतेपद

स्वाती वेमूल

अभिनेता विशाल निकमने (Vishal Nikam) बिग बॉस मराठी ३चं विजेतेपद पटकावलंय. कलर्स मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस मराठी सिजन 3 या कार्यक्रमावर रविवारी अखेरचा पडदा पडला. या पर्वाचा विजेता विशाल निकम (Winner of bigg boss marathi season 3) तर उपविजेत्याचा मान जय दुधाणे याने पटकावला. विशालला बिग बॉसची ट्रॉफी आणि 20 लाख रुपयांचा धनादेश मिळाला. विजेता बनल्यानंतर विशालची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत. "ही तर फक्त सुरुवात आहे", असं तो म्हणाला. (Bigg Boss Marathi 3 Winner Vishal Nikam First reaction)

विशालची पहिली प्रतिक्रिया-

"तुमची साथ आणि माऊलींचा आशीर्वाद, सर्व रसिकप्रेक्षकांचे मनापासून आभार. मी नेहमीप्रमाणे हेच म्हणेन की, आईशप्पथ सांगतो, तुम्ही होतात म्हणून मी इथवर आलो आणि आता ही ट्रॉफी हातात घेतली. या गावातून येणाऱ्या पोराला तुम्ही आज महाराष्ट्राचा फेव्हरेट केलाय, बिग बॉस सिझन ३चा विजेता बनवलाय. तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं. ही तर फक्त सुरुवात आहे," अशा शब्दांत विशालने आनंद व्यक्त केला. (Bigg Boss Marathi 3 Grand Finale Highlights)

बिग बॉसचा यंदाचा तिसरा सीजन जोरदार गाजला. घरातील जोरदार भांडणं, नवनवीन टास्क यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. या कार्यक्रमात 100 दिवसांच्या या खेळात मनोरंजन विश्वातील 15 कलाकारांनी सहभाग घेतला होता. टॉप 5 स्पर्धकांमध्ये विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे यांच्यामध्ये मोठी चुरस होती. यामध्ये विशाल निकमने बाजी मारली. अतिशय थाटामाटात हा महाअंतिम सोहळा पार पडला. सर्वचजण विशाल निकमवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी!'सातारा जिल्ह्यातील ८४ हजार बहिणी अपात्र'; चुकीच्या पद्धतीने घेतला १५१ कोटींचा लाभ, जिल्ह्यात खळबळ

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्याला बनवा टेस्टी, झटपट घरच्या घरी बनवा पनीर कॉर्न बॉल

Truck Accident: नांदेडहून गुजरातकडे निघालेल्या ट्रकचा पातूरजवळ अपघात; चालक आणि मित्र ठार, परिवारावर दु:खाचा धक्का

तरुणांनो, पोलिस भरतीची ऑक्टोबरअखेर मैदानी चाचणी! एका पदासाठी १० उमेदवारांची लेखीसाठी होईल निवड, मैदानी अन्‌ लेखी चाचणी कशी असणार, वाचा...

Dharashiv Accident: कंटेनरची कारला धडक; महिला डॉक्टरचा मृत्यू, बीड जिल्ह्यातील डॉ. विशाल बडे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT