
-प्रशांत घाडगे
सातारा : विधानसभेच्या तोंडावर सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांच्या फेरतपासणीत तब्बल ८४ हजार १३ महिला उत्पन्न मर्यादा ओलांडल्याने अपात्र ठरल्या आहेत. दीड हजार रुपये लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटींनुसार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेत असणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक शासकीय नोकरदार व अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांनी शासनाचा चुकीच्या पद्धतीने वर्षभरात तब्बल १५१ कोटींचा लाभ घेतल्याचे तपासात उघड झाले.