Bigg Boss Marathi 4 akshay kelkar talks about his break up and love life sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: आईनेच जुळवून दिलं होतं,पण.. अक्षयने सांगितला ब्रेक अपचा किस्सा!

अभिनेता अक्षय केळकर झाला भाऊक, सांगितली ब्रेकअपची आठवणी..

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवा ट्विस्ट येत आहे. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होऊन पाच दिवस झाले नाही तोवरच वाद आणि भांडणांना सुरुवात झाली आहे. शिवाय वेगवेगळे टास्क, नाच-गाणी, गॉसिप, कॅप्टनसी टास्क यामुळे भलतीच रंगत येत आहे. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व 2 ऑक्टोबर रोजी सुरू झाले. रविवारी 16 स्पर्धकांनी घरात प्रवेश केला. पहिल्याच दिवसापासून बिग बॉसच्या घरात मनोरंजनाचे वारे वाहू लागले आहे. शिवाय प्रत्येकाची गुपितं बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. आगमी भागात आपण पाहणार आहोत की अभिनेता अक्षय केळकर आपल्या पहिल्या प्रेमा विषयी आणि ब्रेक अप विषयी बोलणार आहे.

(Bigg Boss Marathi 4 akshay kelkar talks about his break up and love life)

बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला मिळेल की यशश्री, किरण, योगेश, समृद्धी, विकास यांच्यात शाळेच्या गप्पागोष्टी रंगल्या आहेत. यशश्रीचे म्हणते की, मी आज जे काही आहे ते माझ्या शिक्षकांमुळे. शाळेमध्ये मी ऑल राऊंडर होते. सगळं करायचे.. न्युज वाचायचे, प्रार्थना म्हणायचे ते अगदी शाळा ते कॉलेजपर्यंतचा प्रवास तिने उलगडला.

यावेळी अक्षय केळकरने आपल्या ब्रेकअपची गोष्ट सांगितली. तो म्हणाला, 'आमच्याच नात्यातीलच एक मुलगी मला सारखे मेसेजेस पाठवत होती. ही बाबा माझ्या आईच्या निदर्शनास आली. मी सुरवातीला मेसेजेस इग्नोर केले पण आईने मात्र सांगितले की, ती मुलगी तुला मेसेजेस करतं आहे म्हणजे ती तुझ्यात इंटरेस्टेड असावी. ती माझ्याच नात्यातील होती म्हणून मी तिच्या घरी रहायला गेलो. त्यावेळी बरीच चर्चाही झाली. पुढे तो म्हणाला.. छानचं होते ते क्षण, पण आमचा ब्रेक अप झाला. माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम आईनी जुळवून दिलं होतं.'अशी आठवण त्याने सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : 'मी महादेवाचा अवतार, तुला चांगलं करिअर घडवायचं असेल तर..'; वासनांध खरातचा शिक्षण घेणाऱ्या युवतीवर अत्याचार, कॅप्टनविरोधात सातवा गुन्हा

IPL 2026 Marathi News: चेन्नई सुपर किंग्सचं चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज... ऋतुराजने सांगितली ओपनिंग जोडी, आता धमाल येणार

Akkalkot News: तीर्थक्षेत्र अक्कलकोटमध्ये दर गुरुवारी मांस विक्री बंद; नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टींचा घोषणा; आजपासून अंमलबजावणी!

Vaibhavwadi Kolhapur Railway Project : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा ‘डीपीआर’ तयार : रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत उलटली, २३ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT